वाह हाच चहा हवा

वाह हाच चहा हवा  ही वाक्य सरळ किंवा उलट वाचली तरी अर्थ एकच होतो . त्याचप्रमाणे तुम्ही चहा हा टपरीवर किंवा दुकानात किंवा ग्लास मध्ये किंवा कप मध्ये कसा ही पिला की चहा पिणारा तृप्त होतोच असा काही चहा चा परिणाम आहे . कॉलेज मध्ये शिकत असताना किंवा वस्तीगृहात राहतांना आनंदाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा आणि वेळेच्या दृष्टीने सगळ्यात छोटा असा काळ म्हणजे चहा पिण्याचा .चहा पिण्याची सवय नसताना केवळ चहा पिणाऱ्या च्या सोबत गेल्याने आणि एक दोन घोटाने सुरुवात होऊन नंतर दिवसातून चार ते पाच वेळा देखील चहाने तृप्त न होणारी सवय म्हणजे अस्सल चहेत्या चे  लक्षण आहे .हॉस्टेल पासून जवळच बुड्डी लेन परिसरामध्ये गुड्डू भाई चहाच्या दुकानात चहा पिणे म्हणजे एक प्रकारचे सोशल इंजिनिअरिंगचा होते .कधी आवडत्या सीनियर सोबत तर कधी आवडत्या जूनियर सोबत चहा पिताना जी वैचारिक बैठक बसायची त्याची तुलना मोडक्या तोडक्या टेबल-खुर्च्या च्या बैठकीशी कधीच होणार नाही .                                                                                                               हॉस्टेल वरच्या वाढदिवशी सगळ्या लहान मोठ्यांना सोबत घेऊन चहाची पार्टी ती द्यायची देखील रात्री बारा वाजता केक कापल्यानंतर  हा  सर्वमान्य सार्वकालिक आणि त्रिकालाबाधित नियम होता .त्याला मुसळधार पाऊस किंवा कडक थंडी यांचाही अपवाद नसायचा .एरवी चहासोबत क्वचित भेट घेणारे केक ,क्रीम रोल ,बिस्किट्स यांचा मिलाप चहासोबत वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे रात्री  नक्की व्हायची .त्या दिवशी हा भरत मिलाप होत असे . रात्री चहा पिऊन कधीकधी बराच उशीर  होत असे तेव्हा पोलिसांची गाडी पेट्रोलिंग वरती यायची .तेव्हा  चहाच्या दुकानाचे शटर बंद करून आत दाटीवाटीने बसून काहीही आवाज न करता दहा ते पंधरा मिनिटे शांत घालवलेली होस्टेल वरच्या मुलांसाठी खूप मोठी गोष्ट होती .कदाचित इतर कधीही होस्टेलवर ची पार्टी आणि कार्टी एवढी शांत नसायची .                                                                                                                        कदाचित चहा च्या दुकानाच्या बाजूला रस्त्यावरती आणि गल्लीच्या कोपऱ्यात बसून किंवा उभे राहून चहा पिण्यात जी मजा होती तेव्हा ती कशातही नव्हती .परीक्षेत च्या काळात या गुड्डू भाऊ च्या चहाची चव थोडाच अभ्यास करून आलेला बराच मोठा कंटाळा दूर घालवण्यास मदत करत असे. मग चहा पिताना गप्पांच्या ओघात  उद्या च्या परीक्षेत कोणता प्रश्न पडू शकतो यावर तिथे पैज देखील लागायची आणि ती देखील गुड्डू भाई च्या चहाचा कप वरच .विजयी होऊन चहाचा कप उंचावत विजेत्या ची ऐट त्या दिवशी बघण्यालायक असायची .                                                                                                                       होस्टेलच्या परिघातच चहाची विक्री करणारा अजून एक सेवा केंद्र होतं ते म्हणजे सलीम चाचा आणि त्याची चहाची टपरी .होस्टेलच्या प्रवेशद्वाराच्या मुख्य मार्गावर चाचा आपले बस्तान मांडून होता  .सिमेंटचे पक्के दुकान असताना देखील त्याला चहाची टपरी असं का म्हणायचे याचे उत्तर द्यायला त्यांच्याकडे वेळच नसायचा तो .तिथे बसून एकदा चहाची ऑर्डर दिली की ती जास्तीत जास्त किती वेळ लांबु शकते याचा काही नेम नव्हता .खूप वेळ वाट पाहायला लावून नंतर मोठा ग्लास भरून चहा देण्यात जी गंमत वाटायची सलीम चाचाला  तीच गम्मत चहा पिणाऱ्याला वाटायची . तिथल्या चहाच्या सोबतीला अजून एक गोष्ट असायची .ती म्हणजे टोस्ट .मोठा ग्लास भरून चहा आणि त्याच्यासोबत टोस्ट खाल्ल्याशिवाय तर काही तो चहा संपत नसे .सदैव हसत राहणारा हा सलीम चाचा आजही आठवला की सोबत त्याच्या टोस्ट आणि मोठा चहाचा ग्लास सोबतीला दिसतोच .                                                          कॉलेजमध्ये असताना भराडी  नावाचा चहाचा ब्रँड अँबेसेडर देखील होता .त्याची स्पेशालिटी म्हणजे कोळशाच्या भट्टीवर चहा करण्याची त्याची कला .त्या चहाची चव वेगळी असायची .लोखंडाची गोल पंखा असलेली ती छोटीशी भट्टी कोळसा टाकून निखाऱ्या वर ती चालायची .बरेच वेळा त्या कोळशाची राख चहाच्या ग्लास वरती लागलेली असायची ,अनेकदा सांगून सुद्धा भराडी काही त्या चहा आणि राखेची संगत सोडायला तयार नव्हता .मग नंतर चहाच्या सवयीप्रमाणेच त्या राखेचीही  ही सवय शेवटी लागून गेली ती कायमचीच.अस हे चहापुराण .

मोहन मुठाळ

More ebooks available on Amazon.in
To visit click here


Timed Pop-up Widget Sidebar

Need help in ebook publishing?

Chat with us on WhatsApp!

Start your amazon e-book store

Comments

Popular Posts