वर्तुळ


काही वर्षांपूर्वी औरंगाबाद येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना एक लघु चित्रपट महोत्सव बघण्याचा योग आला होता . अतिशय सुंदर असे राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त अनेक लघुचित्रपट त्यामध्ये दाखवले होते .त्यातील एक म्हणजे  वर्तुळ. या वर्तुळ चित्रपटाची कथा कोरोना आणि गावी परतणारी गर्दी या कडे बघून  निमित्त मात्र समोर  आली .

शाळेत  शिकत असलेला एक आठ दहा वर्षाचा मुलगा .त्याची आई घरात एकटिच . वडील देवाघरी गेले आणि आई इतरांच्या घरची काबाड कष्टाची कामे करून आपलं व मुलाचा उदरनिर्वाह सांभाळणारी एक मध्यमवयीन अडाणी म्हणावं तर चालेल अशी एक स्त्री .अंगावर साधी साडीचोळी . घरात विजेचा पत्ता नाही . चूल घरात मोजके पण नीटनेटके लावून ठेवलेले डब्बे आणि दाटीवाटीच्या वस्तीत एक लहानशी झोपडी वजा खोली, याला काही लोक घर म्हणावं तर म्हणू शकतात .

मुलगा शाळेच्या कपड्यावर बाहेर अंगणात खेळत असतो ,त्यानंतर  आई त्याला आत बोलवून काही पैशांची नाणी हातात देते व आज त्याच्या आवडीचा गोड खाऊ करायचा आहे त्याची तयारी म्हणून त्याला वाण्याच्या दुकानातून थोडा गुळ  आणायला सांगते व वाटेत मित्रांसोबत खेळत बसू नको आणि उशिर करू नको असे देखील बजावते .सायंकाळी लवकर घरी ये असे बजावून सांगते . मुलगा खुशीत येऊन आईला घट्ट मिठी मारतो आणि बाहेर पडतो कदाचित  मुलाचा वाढदिवस असेल म्हणून तेवढेच गोडधोडाचे कारण .

मुलगा शाळेच्या कपड्यावर आईने दिलेले  खाऊचे पैसे घेऊन घराबाहेर पडतो . वाटेत त्याला त्याच्याच वर्गातील त्याच्या वयाची काही मुलं एक खेळ खेळताना दिसतात .ती मुलं त्याला खेळायला बोलतात मात्र तो नाही म्हणतो .आईने सांगितल्याप्रमाणे उशीर नको म्हणून . ती मुलं त्यांच्या जवळची पैशांची नाणे जमिनीवर टाकून ,  सांगितलेल्या नाण्यावर नेम धरून दगड मारण्याचा खेळ खेळत असतात आणि त्या खेळांमध्ये भाग घ्यायचा असेल तर मुलाला एक नाण त्यामध्ये टाकावं लागतं इतका साधा तो खेळ .ह्या मुलाला तो खेळ  खेळायची मित्रांसोबत इच्छा असते मात्र आईने  दिलेले  नाणे हे यासाठी वापरावे की नाही यासाठी तो थोडा विचार करत थांबतो. मात्र थोड्या वेळानंतर खेळण्याचा लोभ त्याला आवरत नाही . तो खेळायला तयार होतो .हातातलं  नाणं देऊन आनंदाने खेळायला सुरुवात करतो .

खेळता-खेळता बराच वेळ होतो आणि संध्याकाळ व्हायला होते आणि फार उशीर झाला असे त्याला वाटते .आता घरी आई वाट पाहत असेल त्याची त्या मुलाला आठवण होते तो थोडासा कावराबावरा होतो व खेळून झाल्यानंतर आपल्या नाण्याला हातात घेऊन तो बघतो तर त्याला दगडाने मार लागल्यामुळे ते नाणं  खराब झालेले असते .आता मात्र ते खराब नाणं वाण्याकडे  घेऊन जातो व गूळ  मागतो  . वाणी  त्याला थोडासा गूळ  बांधून देतो ,मात्र मुलाने खिश्यातून खराब झालेले नाण दिल्यावर तो वाणी ते पैश्याच नाणं घेत नाही आणि मुलाच्या हातात दिलेला गुळ परत घेतो .आता मात्र आई रागवेल या विचाराने त्याला वाईट वाटते आणि आईने सांगितलेल्या आपण ऐकले नाही याची देखील त्याला  जाणीव होते घरी .

तो जड पावलाने  घरी जात रस्त्यात लागलेल्या मंदिराच्या पायऱ्यावर  बराच वेळ बसतो . आईला काय उत्तर द्यावे या विचाराने तो हबकतो व त्याला रडू येते  .काही वेळाने रडू थांबुन तो उशिरा घरी येतो .आई  त्याला विचारते  बाळा तू इतका उशीर का केलास ? तुला भूक नाही लागली का ? आणि गुळ  कुठे आहे मुलगा ? मुलगा  लगेच आईला बिलगतो आणि रडायला लागतो .आई त्याच्या हातात असलेलं खराब झालेलं नाणं बघते आणि आई काहीच न सांगता सगळे समजून घेते.

आई त्याला प्रेमाने त्याला मांडीवर घेते. आई त्याला समजावते  बाळा बघ आयुष्यात कधी कधी हातातल्या गोष्टी आपल्या जवळ असतात मात्र आपण त्या सोडून पळत्या  गोष्टींचा पाठलाग करू लागलो . एक वेळ अशी येते की  आपण स्वतः आपल्या हातात असलेल्या गोष्टींची किंमत देखील कमी करतोे .




like comment share

thanks

see you again.

Comments