मरिन ड्राईव्ह आणि आईस क्रीम
मुंबई सारख्या अवाढव्य शहरात प्रशिक्षण घेणाऱ्या दातांच्या डॉक्टरांचे किस्से तसे पाहिले तर सारे जगावेगळे नसतात , मात्र एका विशिष्ट नजरेतून पाहिले असता त्यातील विलक्षण पणा समजून घेता येतो .नेहमीप्रमाणे रुग्ण उपचार झाल्यानंतर घरचा रस्ता पकडतात मात्र काही वेळेस गोष्ट निराळी असू शकते .त्यावेळेस मुखशल्य विभागात काम करीत असताना बारा प्रशिक्षणार्थी पैकी आम्ही दोन तीन मुलं आणि इतर मुली होत्या . एके दिवशी विभागात दैनदिन काम सुरू होते . विभागातील दहा खुर्च्यांवर रुग्ण बसलेले होते . तेव्हा अचानक एक रुग्ण मुलगी दंत उपचार सुरू असताना खुर्चीवरून उठून , मोठ्याने ओरडून आदळआपट करून बाहेर निघून गेली . मला इथे थांबायचं नाही अन उपचार सुध्दा करायचे नाहीत असे ओरडून बाहेर पडली .त्यावेळेस तिच्याजवळ फक्त आम्ही मुलं उभे होतो. अशा वेळी इतर रुग्ण किंवा सहकारी किंवा कर्मचारी किंवा अधिकारी यांच्या डोक्यात पहिला विचार काय येणार ? लगेचच वरिष्ठ डॉक्टरांनी तिला बोलावून घेतले आणि काय झालं ते विचारलं . इकडे मात्र इतर सहकारी प्रशिक्षणार्थी मुली आम्हा मुलांना जवळ घेऊन तुम्ही काय केलं आणि तुम्ही कशाला अस केलं विचारू लागल्या , आम्हाला काहीही न विचारता . तुम्ही ने मिलकर कुछ किया होगा असं त्याचं सरळ साधं मत होतं अशा प्रश्नांची आणि प्रश्नार्थक नजरेची सरबत्ती आमच्यावरती सुरू सगळीकडून सुरू झाली .मात्र थोड्या वेळाने शांत झाल्यावर ती मुलगी वरिष्ठांना सांगत होती की माझा एक दात काढण्यासाठी मी इथे आले तर तो दात काढायला मला दोन-तीन वेळा बोलावलं . काढायचा दात ऐवजी त्याच्या समोर चा हलवून टाकला आणि पुन्हा तो पक्का करण्यासाठी एक तार बसविला नंतर तो काढताना बरोबर नाही काढला दिला . इतका त्रास मी नाही सहन करू शकता आता . त्यामुळे मला जेवणही करता येत नाही आणि जो त्रास झाला तो खूप झाला . त्यावर वरिष्ठांनी अस झालं त्या बद्दल माफी मागितली आणि अस का झालं असेल हेही तिला समजावून सांगितले . तेव्हा तीचा राग शांत झाला .तिने असं सविस्तर सांगितलं नंतर कुठं आमच्या जीवात जीव आला मात्र तोपर्यंत सगळयांनी आम्हाला काहीतरी उलटसुलट केले असे विचारून विचारून आमचा जीव घेतला होताच . त्यानंतर आम्ही बराच वेळ वर मरीन ड्राईव्ह वर बसून होतो आणि अथांग समुद्राकडे बघत आईस क्रीम खात जीव शांत करत होतो .
मोहन मुठाळ
Comments