काही वर्षांपूर्वी एका दक्षिण भारतीय चित्रपट दशावतारम या चित्रपटाची बटरफ्लाय इफेक्ट थेअरी या संकल्पनेवर कथा साकारली . या संकल्पनेनुसार जगाच्या एक कोपऱ्यात फुलपाखरु सारख्या छोट्या जीव जंतू याने पंख फडकवले तर त्याचा परिणाम जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात एखाद्या मोठया घटनेवर होऊ शकतो इतक्या या घटना संबध ठेवून असतात .कोरोना सारख्या संक्रमणावर पाश्चात्य चित्रपट निर्मिती contagion ही किती खरी होती याची चर्चा करण्यात आपण धन्यता मानतो मात्र भारतीय चित्रपट निर्मिती पण किती खरी आणि आशयघन असू शकते , कारणमीमांसा करणारी असू शकते हे आपण साहजिकच विसरून जातो . दशावतार या मध्ये कमल हसन या अभिनेत्याने प्रोस्थेटिक मेकअप वापरून निरनिराळ्या सात ते आठ भूमिका अतिशय सुंदरपणे रेखाटल्या होत्या . सध्या सुरू असलेल्या कोरोना या जागतिक आरोग्य महामारी विषयी हा चित्रपट खूप जवळीक साधतो . कोरोना ही महामारी मानवनिर्मित आहे किंवा नैसर्गिक आपत्ती आहे याला सध्यातरी जगात वादाची किनार आहे . तसेच काही वर्षांपूर्वी नैसर्गिक आपत्ती म्हणजे सुनामी लाटेचा विध्वंस यावर आधारित दशावतार या चित्रपटाची कथा रचण्यात आली होती .कित्येक निष्पाप जीव मारून निसर्गाला यात काय प्राप्ती झाली असेल किंवा अनेक लोकांचे आयुष्य खर्ची घालून तयार केलेले संसार एका क्षणार्धात नष्ट करण्यात निसर्गाने कोणता हिशोब मांडला असेल याची एक शक्यता या चित्रपटात मांडण्यात आलेली होती . मानवाने निर्माण केलेल्या एका खतरनाक जैविक हत्यार अर्थातच बायो वेपन विषयी हा चित्रपट आहे .हे जैविक हत्यार चुकीच्या हातात पडून संपूर्ण मानव जात नष्ट होऊ शकते आणि तसे होऊ नये म्हणून एका दक्षिण भारतीय वैज्ञानिकांची धडपड व त्या जैविक हत्यारांवर इतर राष्ट्रांच्या गुप्तहेर संघटना पासून किंवा गुप्तहेरांना पासून लपवण्याचा प्रयत्न छानपणे मांडण्यात आलेला आहे . कमल हसन याने यात एका दक्षिण भारतीय वैज्ञानिकांची भूमिका निभावलेली होती . देवावर भक्ती असणारा परंतु त्यापेक्षा किंचित जास्त विश्वास विज्ञानावर असणाऱ्या दक्षिण भारतीय वैज्ञानिकाच पात्र होतं .सोबतच जगात घडणारी प्रत्येक घटना ही निसर्ग किंवा देवाशिवाय इतर कोणीही करत नाही असा भोळा भाबडा विश्वास असणारी त्याची नायिका अस दोन्ही बाजूंना विचार करणार नाट्य होत . नाही तर सुनामी सारखी नैसर्गिक आपत्ती आणून निसर्गाने कुठली योग्य गोष्ट केली असं विचारणारा विज्ञाननिष्ठ नायक आणि यातही देवाची काहीतरी कृपा आणि लीला असणारच यावर गाढ विश्वास असलेली नायिका यामधील कथा उत्कंठावर्धक आहेच .मानवजातीला नष्ट करण्याचं सामर्थ्य असलेलं जैविक हत्यार या प्रयत्नांमध्ये चुकून फुटून जात आणि त्याचा प्रसार मानवांमध्ये होतो आणि संपूर्ण जग नष्ट होण्याची भीती निर्माण होते तेव्हा या घातक विषाणूला निष्प्रभ आणि नष्ट करण्याची एकच वैज्ञानिक उपाय असतो . तो म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर सोडियम क्लोराइड या प्रकारचे रसायन जर त्याच्याभोवती आले तर तो घातक विषाणू किंवा जैविक हत्यार निष्प्रभ आणि नष्ट होईल . जमिनीवर येवढ्या मोठ्या प्रमाणात सोडियम क्लोराइड एवढ्या कमी वेळात जमा करणे हे मानवाला तरी अशक्य असते ह्यामुळेच जर निसर्गाने संपूर्ण मानवजात वाचवण्यासाठी निसर्गतः समुद्राच्या पाण्यात असलेले सोडियम क्लोराइड हे ज्या ठिकाणी जैविक हत्यारांचा स्पर्श झाला त्या ठिकाणी आणले तर त्यात वाईट झाले काय ? आता या गोष्टीला अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेऊ शकतात किंवा यावर भिन्न मत आणि मतं प्रकार असू शकतात . ही झाली गोष्ट दशावतार चित्रपटाच्या शेवटाची .तसेच चित्रपटाच्या सुरुवातीला प्राचीन भारतातील काळ दाखवला आहे . जेव्हा पृथ्वीवरती दैत्य ,असुर ,राक्षस नष्ट झालेले असतात आणि आता मात्र फक्त सूर ,देव त्यांचे अनुयायी हेच राहत असतात .त्यावेळेस शैव आणि वैष्णव असे दोन पंथ भारतात मुख्यतः होते . शैव पंथीय हे शिवाला मानणारे होते तर वैष्णव पंथीय हे नारायणाला म्हणजे विष्णूला मानणारे होते .त्यावेळेस एका राज्यात एक शैवपंथाचा राजा आपल्या राज्यातील एक वैष्णव पंथीय भक्ताला विष्णूची सेवा सोडून शिवाची सेवा करायला पूजा करायला सांगतो तसे नाही केले तर त्याला देहदंड आणि मृत्युदंडाची धमकी देतो . हे पुरातन काळातील विष्णू भक्ताचे पात्र कमल हसन याने साकारलेले होते व मृत्यू दंडाची भीती न बाळगता तो भक्त मृत्यू दंडाला सामोरे जातो . तेव्हा तो दुष्ट राजा त्याच्य भक्ताच्या प्रिय विष्णू मूर्तीला जी प्रचंड शिळेपासून तयार केलेली असते त्याला साखळदंडांने त्याला बांधून तो समुद्रात ढकलून देतो .ही चित्रपटाची सुरुवात असते आणि चित्रपटाचा पुढचा भाग हा विसाव्या शतकात येतो जिथे बायो वेपन सारखी अस्त्रे असतात . शेवटी जेव्हा सुनामी समुद्रातले खार पाणी घेऊन जमिनीवर विषाणूचा नष्ट करायला येते तेव्हा तेच पाणी समुद्रात खोल वर असलेली विष्णूची मूर्ती देखील योगायोगाने जमिनीवर आणून टाकतो . नायक आणि नायिका याच प्रचंड अशा विष्णू मूर्ती जवळ सुनामी मुळे झालेला संहार पाहत उभे असतात . देवभोळी नायिका नायकाला विचारते आता तरी तुला देव आहे यावर विश्वास बसला ना ? त्यावर विज्ञाननिष्ठ नायक उत्तर देतो की देव आहे की नाही हे मला माहित नाही परंतु देव असला तर ती फार चांगली गोष्ट आहे .
Comments