बीबी का मकबरा आणि कैरी




मुंबई येथे एका आयुर्वेद महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर योगायोगानेच औरंगाबाद येथील एका दंत वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश झाला .तेव्हा एका ओळखीच्या व्यक्तीकडून रूम घेऊन राहत होतो ,तेव्हाची ही गोष्ट .ती खोली होती बीबी का मकबरा या ऐतिहासिक वास्तूच्या परिसराजवळ .डोंगराच्या पायथ्याशी वस्ती असल्याने छान निसर्गसौंदर्य तिथे होतेच मात्र विद्यापीठाचे मोठाली उद्याने ,मोठे रस्ते ,उंच झाडे आणि विद्यार्थ्यांची होणारी गर्दी यामुळे देखील तिथे राहण्याचे सुख अप्रतिम होते .पहिल्या वर्षाला असताना फारसा वेळ अभ्यासात घालवायचा असल्याने फक्त रविवारी खोली बाहेर पडायचो. मकबऱ्या च्या समोर मोकळ्या जागेत एक मोठे कडुनिंबाचे झाड होते  .त्याच्या सभोवतीस सिमेंटचा पक्का गोल असा ओटा बांधलेला होता  .त्यावर तास दोन तास गप्पा मारत आम्ही बसायचो .महाविद्यालयात नवीन असल्याकारणाने वस्तीगृहात जायची सोय काही नव्हती. मात्र त्यातही काही जण वस्तीगृहात राहायचे .त्यातील एक जण असाच एका रविवारी रूमवरती आम्हाला भेटायला आला . मी, माझा रूम पार्टनर आणि तो मग आम्ही तिघेही बीबी का मकबरा पहायला गेलो . बहुदा पहिल्यांदाच . प्रचंड अशी वास्तू असलेली ती जागा चहूबाजूंनी आंब्याच्या झाडांनी नटलेली होती . उन्हाळा होता . तेव्हा सगळ्या झाडांवर छान  मोठ्या कैर्‍या लागलेल्या होत्या .त्या  खाली पाडण्यासाठी मी एक दगड हातात उचलला आणि नेम धरून मारला मात्र काही उपयोग झाला नाही  मग माझ्या पार्टनरने दोन दगड हातात घेतले आणि नेम लावले तरी सुद्धा कधी दाजड सोडून इतर काहीही खाली पडले नाही . आमचे नशीब जर  जोरावरच होते . ते का तुम्हाला आता समोर कळेलच . मात्र त्यानंतर त्या वस्तीगृहात राहत असलेल्या  मित्राने एकच दगड हातात घेतला आणि नेम मारला तेव्हा २-३ कैऱ्या खाली येऊन पडल्या . कोणी पाहत नाही ना असे लक्षात आले तेव्हा आम्ही त्या उचलायला त्यांच्याजवळ जाणार तेवढ्यातच एक भलामोठा आडंदाड पैलवान आमच्या कडे आवाज देत जवळ येत  होता . आम्हाला वाटलं कुणीतरी पर्यटक असेल आणि तो आम्हाला कशाला आवाज येईल . मग आम्ही खाली पडलेल्या कैऱ्या हातात उचलल्या . तेवढ्यात तो पैलवान पटकन आमच्याजवळ आला , त्याने आमच्याकडे असलेल्या कैऱ्या   हिसकावून घेतल्या . तुम्ही कैऱ्या का तोडल्या आता तुम्हाला दंड भरावा लागेल असआम्हाला दटावून  सांगू लागला .आता दंड भरावा लागेल अस म्हणून आम्ही घाबरून त्याला म्हणालो त्या अगोदरच खाली पडलेल्या होत्या फक्त आम्ही उचलल्या .मात्र त्यावर तो म्हणाला तुम्ही उचलल्या ना मग तरी   तुम्हाला तर दंड भरावाच लागेल . घाबरत मग खिशात आम्ही जेवढे काही पैसे होते चाळीस पन्नास रुपये ते त्याला दिले .मात्र त्याने ते पैसे तर घेतलेच मात्र कैऱ्या देखील परत दिल्या नाहीत. वरती आम्हाला धमकी देऊन म्हणाला की पुन्हा इथे आला आणि दगड मारुन पाहिला आणि कैरी घेतली तर बघा तुम्हाला दाखवतो कैरी ची  चव कशी  असते ते . नंतर आम्ही तिथून निघून गेलो .मात्र जाताना एक जण मकबऱ्याकडे ,एक जण रिकाम्या खिश्या कडे आणि एक जण कैऱ्याकडे पाहत होतो आणि  एकमेकांकडे पाहत बराच वेळ हसत  होतो

मोहन मुठाळ

More ebooks available on Amazon.in
To.visit please click here
Timed Pop-up Widget Sidebar

Need help for ebook publishing?

Chat with us on WhatsApp!

Start your ebook Store on Amazon

Comments

Popular Posts