परवाना आणि heroine


औरंगाबाद येथे प्रशिक्षण घेत असतानाची ही गोष्ट आहे . वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय महाविद्यालयांचे परिसर एकच असताना बहुतेक रुग्णांना कुठे जायचे हे सहसा कळत नसायचे .परत त्यात विभागांना दिले जाणारे क्रमांक म्हणजे  १०१,१०२,२०१,२०२  रुग्णांना फार पटकन कळत नसायचं. मी आणि माझी एक सहकारी स्त्री डॉक्टर आम्ही दंत विभागाच्या ओपीडी ला बसलो असताना एक किशोरवयीन रुग्ण घेऊन आत खुर्चीवर बसला .काय त्रास आहे असा विचारला जाणारा हा बहुदा प्रश्न आम्ही रुग्णांना विचारत असायचो आणि त्यानंतर रुग्ण काय करतील , काय सांगतील , काय उलटसुलट उत्तर देतील याचा नेम नसायचा . जो व्यक्ती प्रश्न विचारतो यावरदेखील रुग्ण उत्तर द्यायचे आणि बदलायचे .माझ्या स्त्री सहकार्‍याने काय त्रास आहे असे विचारताच तो रुग्ण शर्टाचे बटन उघडे करू लागला आणि छातीवर पडलेल्या जखमा दाखवणार तोच डॉक्टर स्त्री सहकारी घाबरून  लगेच बाहेर निघून गेली . मग मी त्याला सविस्तर विभागाचा पत्ता सांगून त्याला योग्य विभागाकडे रवाना केला . मात्र तो परवाना नेमका कोणता त्रास घेऊन  आला होता हेदेखील आम्हाला एक पडलेलं कोडं होत .असे किस्से पुन्हा घडणार नाहीत अशी पुढे काळजी घेण्याची सवय त्यामुळे लागली .मग नेहमी दातांचा काही त्रास आहे का असे विचारण्याची सवय लागली . महिला रुग्ण महिला  डॉक्टर आणि पुरुष रुग्ण  पुरुष डॉक्टर असेच ठरवून दिल्या गेले मग अशा घटना कमी झाल्या. काही वेळेस  स्त्रिया दवाखान्यात जायचं आहे आणि चार चौघात नीटनेटकं दिसावं म्हणून आपापल्या नुसार व्यवस्थित तयार होऊन यायच्या .एकदा अशीच एक तरुण  मुलगी यथोचित शृंगार करून दंत तपासणी साठी आली होती . तपासणीसाठी  ती एका डॉक्टर जवळ आली आणि ते डॉक्टर वयाने आणि अनुभवाने मोठे होते . त्यांनी तिला  खुर्चीवर बसायला सांगितले ,त्यानंतर डॉक्टरांनी तिला तोंड उघडायला सांगितले .त्यांनी बघितले तर तिचे बरेच  दात खराब झाले होते .डॉक्टर तिला म्हणाले हिरोईन सारखा मेक अप करून, इतकी तयारी करून तुम्ही दवाखान्यात येता  यापेक्षा इतका वेळ जर तुम्ही काळजी दातांची घेतली तर इतका प्रॉब्लेम होणार नाही .असं म्हणताच ती  खाली पहात होती आणि रांगेतील रुग्ण मात्र गालातल्या गालात हसत होते .

मोहन मुठाळ

Comments

Popular Posts