अण्णा याची अन्नाची कॅन्टीन



 मागे सांगितल्याप्रमाणे औरंगाबाद येथे रूम करून राहत असताना दंत वैद्यकीय महाविद्यालय जीवनाचा अविभाज्य झालेली  जागा म्हणजे अन्नाची कॅन्टीन हो अण्णा चीच . ती खरं बघता मेडिकल कॉलेजची कॅन्टीन होती ,मात्र दंत वैद्यकीय शिक्षणाचे पहिले दोन वर्ष हे मेडिकलचे काही विषय शिकत असतांना आमची ओळख झाली .भल्यामोठ्या मेडिकल कॉलेजच्या इमारतीतील तळघरातील जागा तशी साधारणच विशेष अस काही नाही .मोठे मोठे चौकोनी ८-१० टेबल .त्यावर साधारणत:३०-४० बसण्यास8 खुर्च्या . तसे पाहता कॉलेजच्या कॅम्पसमध्ये इतरही दोन कॅन्टीन होती एक मुलांच्या वस्तीगृहात  आणि दुसरी हॉस्पिटल जवळ स्टाफसाठी . मात्र जी चव  इथल्या पोहयाला आणि समोस्याला होती ती निराळीच . बहुदा उत्तर भारतीय पंजाबी समोसा आणि दक्षिण भारतीय सांबर याचा मनोमिलन करणारा हा अण्णा पहिलाच . पोह्या मध्ये अण्डाभुर्जी टाकून एकत्र करून मोगलाई नावाचा गरमागरम पदार्थ तयार करणारा  अण्णा जगावेगळा .वडा ,सांबार ,उपमा ,शिरा या इतर पदार्थांची ओळख आणि मग सवय लागली की मात्र पावले आपोआपच एखाद्या ऑफ लेक्चर मध्ये किंवा अगदी सुट्टीच्या दिवशी देखील कॅन्टीन  कडे वळायची . अन्नाचा स्वभाव तिथे बसायच्या मोकळ्या जागे सारखाच मोकळा ढाकळा होता .दररोज सकाळी साधारण साडेसहा च्या जवळपास कॅंटीनच्या दरवाजाला नमस्कार करून अण्णा चा कर्मभूमीत प्रवेश व्हायचा . तसे पहाता अण्णाची  जन्मभूमी दक्षिण भारत पण कर्मभूमी म्हणचे जिएमसी कँटीन .चहा ,दूध यांच्या सोबत horlicks च्या दुधाची गरमागरम धार अण्णा च्या कॅटलीतुन सकाळी सकाळी उगम पावत असे .इतर कॅन्टीनमध्ये असणारा नेहमीचा चिवचिवाट ,गर्दी इथे बहुदा नसायचीच . अण्णाच्या स्वभावाची शांतता देखील तिथल्या जागेसारखीच . म्हणायला अण्णांचा मुलगा कधी कधी तिथे हजर असायचा आणि पैसे किंवा ऑर्डर घेताना मधात अण्णा आणि त्यांच्या मुलाचा हा दक्षिण भारतीय भाषेतला संवाद कानावर पडायचा. इतर कॅन्टीन प्रमाणे अस्वच्छ पाण्याची टाकी मात्र अण्णा च्या  कॅन्टीनमध्ये कधीही दिसली नाही ग्लास मोजके मात्र नेहमी स्वच्छ असणारेच . तर अशी होती अन्नाची कॅन्टीन होय अण्णाची कॅन्टीन.

मोहन मुठाळ
Timed Pop-up Widget Sidebar

Need help?

Chat with us on WhatsApp!

Start Chat
like comment share

thanks

see you again.

Comments

Popular Posts