पीपीई किट आणि डेंटल आयसीयू
औरंगाबाद येथून दंत वैद्यकीय महाविद्यालयात मूलभूत प्रशिक्षण झाल्यानंतर पुढे काय करावे या प्रश्नाच्या उत्तरादाखल मी मुंबई येथे पुढील प्रशिक्षण काही काळ घ्यावं असं मनोमन ठरवलं .पेपर मध्ये आलेली जाहिरात बघून मुंबई येथे चिकित्सालयीन सहाय्यक या तात्पुरत्या नेमणूक असलेल्या पदाचा अर्ज भरला . त्यावेळेस सुमारे पंचवीस जागेसाठी दीडशेपेक्षा जास्त अर्ज आले होते . त्यातून निवड प्रक्रिया पार पडत पडत माझा प्रशिक्षण काळ सुरू झाला. औरंगाबाद येथून निघतांना बऱ्याच परिचित लोकांना मी मुंबईला प्रशिक्षणासाठी जात आहे याचे आश्चर्यच वाटत होते , कारण तिथे कुठे राहणार , कसं करणार ,काय करणार असे त्यांचे प्रश्न होते .तर काही अनुभवी वरिष्ठांनी मात्र नक्की जा आणि प्रशिक्षण काळ पूर्ण करून घे . लोक साधारण सोनं किमती असत म्हणून सोन्यात गुंतवणूक करतात . ही संधी मात्र सोन्या पेक्षा जास्त किमतीची आहे . ही संधी प्राप्त सगळ्यांना भेटत नाही . अशा धीर देण्याऱ्या सल्ल्याने मार्ग सोपा होत गेला . अगोदर चिकित्सालयीन सहाय्यकाला शासनाकडून मानधन मिळत होतं १५०० रुपये मात्र त्या वर्षी ते वाढवून जवळपास १३ हजारापर्यंत केलं होतं त्याच्या भरवशावर मी मुंबई ला जायचा प्रयत्न करू लागलो . तिथे काही अत्याधुनिक दंतचिकित्सा पद्धती माहीती करून घेता येतील असा विचार मनात होता . सुरुवातीला प्रभादेवी येथे गुलमोहर लॉजमध्ये काही काळ खोली मिळेपर्यंत राहण्याची सोय केली. सिद्धिविनायक मंदिराजवळ असलेले हे ठिकाण दादर स्टेशन पासून पायी चालता येण्या सारखे होते . तिथे राहायला गेल्यावर सकाळी उठून तयार होऊन दादर स्टेशनला पोहोचत असे आणि तिथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाण्यासाठी लोकल पकडत असे . सकाळी लवकर गेल्यामुळे ट्रेनमध्ये काही गर्दी नसायची . तेव्हा तिथे माझी एकदा ड्युटी मूखशल्य विभागातील मायनर ओटी येथे लागली, तेव्हाची ही गोष्ट . साधारण विभागाच्या चालू महिन्याच्या शेवटच्या दिवशी तिथे एक विशिष्ट डेंटल आयसीयू विभाग सुरू असायचा .अतिशय घातक संसर्गजन्य रोग असलेल्या रुग्णांची दंत सेवा तिथे होत असे . एचआयव्ही किंवा कावीळ या सारख्या संसर्गजन्य रोगांनी बाधित असलेले रुग्ण यांचे उपचार तिथे विशिष्ट नियम पाळून करता यायचे .सामान्य विभागापासून तो विभाग वेगळा असायचा. इतर रुग्णांना त्यादिवशी बोलवले जात नसे . तसेच निर्जंतुकिकरण करण्यासाठी विशिष्ट फ्युमीगेटर फॉर्मलीन टाकून , दंत उपचार कडक निर्बंध पाळून करावे लागायचे . या दोन तीन महिन्याच्या कालावधीत तिथे काम करण्याची संधी मला मिळाली. डेंटल आयसीयू असलेली बहुदा महाराष्ट्रात शासकीय इमारत ही एकच .दातांच्या तपासणीसाठी तेथे ठराविक वर्गाचे संशयित रुग्ण किंवा लोक म्हणजेच तृतीयपंथी ,टॅक्सी ड्रायव्हर असतील किंवा अँटी रेट्रो वायरल थेरपी सुरू असलेले काही रुग्ण आले की त्यांना योग्य वेळ आणि तारीख देऊन डेंटल आयसीयूमध्ये बोलवाव लागायचं .अशा वेळेस दोन चिकित्सालयीन सहाय्यक सोबत काम करायचे .एकाने दुसऱ्याला ते पीपीई किट घालायला मदत जारायची असे आणि त्यानंतर ती डेंटल ट्रीटमेंट सुरू व्हायची .त्यात कीटमध्ये शुकव्हर , सर्जिकल हेड कॅप ,फेस मास्क डोळ्यांवर गॉगल आणि गळ्यापासून पायापर्यंत असणारा सर्जिकल गाऊन हे सगळं असायच . मुंबईमध्ये एचआयव्ही चे प्रमाण फार आहे आणि विशिष्ट वर्गात त्यांचे प्रमाण अधिकच आहे. ९० टक्क्यांपेक्षा जास्त टॅक्सी ड्रायव्हर आणि तृतीयपंथी हे पॉझिटिव्ह निघायची शंका असायची . त्यांना माहीत नसायचे की त्यांना हा रोग झालेला आहे किंवा माहीत असलं तरी ते लपून ठेवायचे किंवा इतर ठिकाणी सांगितल्यावर उपचारासाठी नाही ऐकले म्हणून सांगायला ते घाबरत . त्यांना नियमाप्रमाणे रक्ताची एक चाचणी करायला सांगायची आणि ती कन्फर्म झाली की एचआयव्ही पॉझिटिव्ह किंवा नुकतेच कावीळ झालेल्या त्या रुग्णांची डेंटल आयसीयूमध्ये उपचार करायला रवानगी व्हायची .अशी दंतउपचार शिकण्याची योग्य वेळ होती आता या कोरोना च्या संक्रमण काळात उपयोगी येईल असे आता वाटते .तर अशी माझी पीपीई किट पहिली ओळख झाली .
मोहन मुठाळ
STAY SAFE . WORK SAFE .
1.For PPE kit details click this -HAVE A LOOK AT THESE PPE KITS 3. For SODIUM HYPOCHLORITE details - CLICK THIS
Comments