आपलेच दात , आपलाच टूथब्रश
आपण वापरत असलेला टूथ ब्रश ने दात खराब होत असले तर काय करावे ?
आपलेच दात आणि आपलाच टूथब्रश या उक्ति प्रमाणे दातान्चे आरोग्य स्वतःच्या हातात आहे . टूथपेस्ट आणि ब्रशने दात स्वच्छ करायची सवय चांगली मात्र योग्य टूथब्रश न वापरल्यामुळे तोटा जास्त .टूथब्रश चे ब्रिसल नवीन असताना फार मुलायम सरळ एका रेषेत आणि लवचिक असतात .अशी ब्रिसल चांगली ती दाताला ईजा करात नाही .मात्र जास्त जोरात किंवा जास्त काळ एकच टूथब्रश वापरल्याने ते ब्रिसल्स कडक वेडेवाकडे आणि हिरड्यांना आणि दातांना जखम करणारे होतात. त्यामुळे आपल्या टूथब्रश च्या ब्रिसल्स कडे लक्ष देऊन दर सहा महिन्यांनी किंवा त्या अगोदर तो टूथब्रश खराब झाला असेल तर बदलून घ्यावा .
उजव्या हाताने ब्रश करणारे व्यक्ती नेहमी डाव्या बाजूच्या दातांना जास्त घासतात किंवा डाव्या हाताने प्रश्न करणारे उजव्या बाजूच्या दातांना जास्त इजा करतात. यामुळे दोन्ही हातांनी ब्रश करणे चांगले असते .दर दिवसाआड कधी उजवा कधी डावा हात वापरून ब्रश करणे देखील चांगले
समोरचे दात सगळ्यांना दिसतात म्हणून जास्त वेळ ब्रश करणारे लोक आपल्याला आजूबाजू ला दिसत असतात .घासून घासून त्या समोरच्या दातांवरती खड्डे पडतात असे न करता ,समोरचे दात आणि मागचे दात दोन्ही एकसमान ब्रश करावे .दररोज जास्तीत जास्त २ मिनिट ब्रश करावा त्यापेक्षा जास्त काळ दाता वर टूथब्रश घासू नये .
मोहन मुठाळ
Comments