दंत आरोग्य पत्रिका - दातदुखी आणि कोमट मीठाच्या पाण्याने गुळणी



दात दुखत असल्यावरती हिरडी, वरती सूज आल्यानंतर किंवा अक्कल दाढीमुळे गालावरती आणि चेहऱ्यावरती सूज येत असेल आणि चेहरा पूर्णपणे उघडत नसेल तर दातांचे डॉक्टर दिवसातून दोन ते तीन वेळा मीठाच्या कोमट पाण्याने गुळण्या करायला सांगतात .बरेचदा दात काढून टाकल्यानंतर ज्या बाजूने जेवण होते तिथे अन्न अडकू नये म्हणून हळूहळू कोमट मीठाच्या पाण्याने जखम स्वच्छ राहावी म्हणून गुळणा करायला सांगितले जाते. हिरडीवर सूज आली तर तिथे जंतूंचे इन्फेक्शन झाले आहे असे समजते. अशा वेळेस सूज  आलेल्या जागी रक्तपुरवठा कमी होत असतो आणि यामुळेच जमा होत असलेला पू वाढत जातो व दुसऱ्या ठिकाणी पसरू शकतो ,अशा वेळेस गरम पाण्याने गुळण्या केल्याने तेथील रक्तपुरवठा वाढत जातो आणि संक्रमण कमी होण्यास मदत होते .मात्र यामध्ये जास्त उशीर झाला तर वाढत जाणारी सूज काही केल्या कमी होत नाही .वेळेवर  केल्यावरती हा उपाय परिणामकारक राहतो .मीठाच्या कोमट पाण्याने गुळण्या केल्याने दातांच्या आणि त्याच्या आजूबाजूला असलेली घाण आणि अन्नाचे तुकडे हे धुवून निघतात, त्यामुळे अगोदर असलेली जखम आणि सूज वाढत देखील नाही उलट ती नियंत्रणात आणता येते. अक्कलदाढ याच्या त्रासामुळे जर तोंड उघडत नसेल तर अशा वेळेस ती जागा ब्रशने साफ होत नाही .कोमट पाण्यात मीठ टाकून मग गुळण्या करूनच त्या अवघड जागेची सूज कमी करता येते .त्रास सुरू झाल्यानंतर पहिल्या काही तासातच हा उपाय केल्यास फरक पडतो मात्र उशिरा उपाय केल्यानंतर औषध उपचाराशिवाय हा त्रास कमी करता येत नाही मग मात्र दंतचिकित्सक यांच्या कडे जाऊन योग्य सल्ला आणि आवश्यक औषधी घेतल्या नंतर सूज संपूर्ण कमी होते .

डॉ मोहन मुठाळ

Comments

Popular Posts