दंत आरोग्य पत्रिका -अल्ट्रा सोनिक पद्धतीने दातांची स्वच्छता



तोंडाला येणारी दुर्गंधी आणि  दातांची अल्ट्रासोनिक मशीन ने स्वच्छता- 

ज्या दातांवर  घाण जमा झालेली असते किंवा जे दात नियमितपणे घरी टूथब्रश वापरून देखील चांगल्या रितीने साफ केल्या जाऊ शकत नाहीत त्या दातांना स्वच्छ करण्यासाठी अल्ट्रासोनिक मशीन चा वापर दातांचे डॉक्टर करतात. यालाच स्केलिंग आणि पॉलिशिंग ट्रीटमेंट असे देखील म्हणतात .

 या पद्धतीने दातांजवळच्या हिरड्या देखील स्वच्छ होतात व यामुळे भविष्यात होणारे हिरड्यांचे आजार संपूर्ण रीतीने टाळता येतात .

दातांची अल्ट्रासोनिक पद्धतीने स्वच्छता करताना आणि केल्यानंतर कोणती काळजी घ्यायची ?
 
हृदयात पेस मेकर बसवलेल्या रुग्णांमध्ये ही दात स्वच्छ करणारी अल्ट्रासोनिक मशीन वापरणे अतिशय धोक्याचे असते. त्यामुळे दातांची स्वच्छता अल्ट्रासोनिक मशीन ने करण्या अगोदर रुग्णाने इतर आजारांची माहिती आपल्या दातांच्या डॉक्टरांना सांगणे खूप फायद्याचे असते .

दातांची अल्ट्रासोनिक मशीन ने स्वच्छता करण्यापूर्वी किमान सात दिवस माऊथ वॉश  वापरणे चांगले असते . अल्ट्रासोनिक मशीन ने दात स्वच्छ करीत असताना काही दातांना ज्यांची अगोदरच झीज झाली असेल तर ठणक लागू शकते अशा वेळेस डॉक्टरांनी दिलेले अँटी सेंसिटीविटी टूथ पेस्ट किंवा माऊथ वॉश किमान आठवडाभर वापरणे चांगले .

अल्ट्रासोनिक पद्धतीने दातांची स्वच्छता केल्यानंतर एक आठवडा अतिशय गरम किंवा थंड अन्नपदार्थ टाळावेत .

 अल्ट्रासोनिक पद्धतीने दात स्वच्छ केल्यानंतर साधारणतः हिरड्यांची होणारी लहानशी जखम भरून निघण्यासाठी लिहून दिलेला मलम हिरड्यांवर दिवसातून दोनदा लावला तर ती हिरडी ची जखम भरण्यास मदत होते .

ह्या अल्ट्रासोनिक पद्धतीने दातांची स्वच्छता करण्यासाठी साधारण एक ते दोन अपॉइंटमेंट ची गरज भासू शकते मात्र हिरड्यांतून जास्त घाण आणि रक्त निघाल्यास हीच प्रक्रिया दोन ते चार अपॉईंटमेंटमध्ये पण करावी लागते .

 अल्ट्रासोनिक पद्धतीने दात स्वच्छ करीत असतांना असताना धूम्रपान आणि मद्यपान टाळावे .

दातांची स्वच्छता नेहमीसाठी टूथब्रश ,फ्लॉस चा वापर करून राखावी आणि दोन दातांच्या फटीमध्ये फसलेले अन्न काढण्यासाठी इंटर डेंटल ब्रशचा वापर करावा .

 अल्ट्रासोनिक पद्धतीने दातांची स्वच्छता केल्यानंतर काही प्रसंगी दाताची ठणक कमी होत नसेल तर दातांच्या डॉक्टरांना त्वरित भेटावे .

Comments

Popular Posts