Nightwalk आणि भूत
मुंबई येथे चिकित्सालयिन पदाचे प्रशिक्षण घेत होतो तेव्हा वेस्टर्न लाईन वरील कॉटन ग्रीन स्टेशन जवळ म्हाडाच्या ट्रान्झिट कॅम्प च्या बिल्डिंग मध्ये राहत होतो .रूम होती सतराव्या मजल्यावरती वर अजून चार मजले होतेच . तशा या 21 मजले असलेल्या अनेक इमारती आजूबाजूला चिटकून येथे उभ्या होत्या .त्या रूमवरून रेल्वेने साधारणत हॉस्पिटल ला पोहोचायला पंधरा मिनिटेच लागत.कॉटन ग्रीन ,सैंड हर्ट्स , मशीद आणि सीएसटी अशी ती रेलवे लाइन होती . सुट्टीच्या दिवशी नुसते फेरफ टका मारा यला किंवा दररोज हॉस्पिटल ला कामाला जाताना दोन्ही गोष्टींसाठी ते ठिकाण मस्त होत. एका ब्रोकर च्या माध्यमातून 40 हजार रुपये डिपॉझिट देऊन आणि महिना दहा हजार रुपये भाडे तेही तिघांमध्ये शेअर करून राहण्याची तयारी आम्ही केली होती. दररोज हॉस्पिटल ला जायच्या अगोदर बिल्डिंगच्या खाली कोपऱ्या जवळच्या दूध विक्री केंद्र जवळ ताज ताक पिऊन नंतर रेल्वे स्टेशनजवळच्या महाकाल मंदिराजवळ नमस्कार करून त्याच्या बाजूच्या किराणा दुकानातून येणाऱ्या तंबाखूच्या उग्र वासाचा दर्प नाका त भरून प्लॅटफॉर्म वरती पोहोचायचं . दिवसभर काम झालं की रात्र व्हायच्या अगोदरच संध्याकाळीच भरपूर झोप लागायची .रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी सकाळी उठून सीएसटीला जाऊन किंवा तिथून बस पकडून मरीन लाईन वरती जायची मजा खूप वेगळी होती . तिथे बसून पेपर वाचत वारा झेलत मज़ा येत असे . त्या अगोदर कॅनोन वरची पाव भाजी किंवा पंचम पूरी इथे स्पेशल थाली खात असु .त्यामध्ये आलू ची भाजी, साधी किंवा स्पेशल पुरी, पापड ,लोणचं मटर ची भाजी, दही साखर आणि ताक असा तो छान बेत जमत असे .एखादे वेळी मित्रांसोबत मनीष मार्केट ला जाऊन काही वस्तूंची खरेदी देखील होत असे, तिथून मग मुंबादेवीचे दर्शन किंवा सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्याशिवाय दिवसाचा शेवट होतच नसे.
हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या गणेश मंदिराचे दर्शन घेऊन आणि गणपतीस्तोत्र म्हणायची सवय तशी लागली होतीच. ट्रेनमध्ये बरेच वेळा काही मंडळी आपापल्या धार्मिक पुस्तकाच्या लहान प्रति लोकल च्या प्रवासात वाचत तेव्हा फार बरे वाटे .
हॉस्पिटल च्या आवारा त प्रवेश केल्यावर मोठ्या झाडांवरती काव काव करत बसलेल्या कावळ्याचा आवाज रूमवरच्या परिसरात नव्हता .बरेच वेळा फिरतांना रात्री उशीर झाला तर रिकाम्या लोकलच्या डब्यांमधून प्लॅटफॉर्मच्या अंधारात काही ठिकाणी नायजेरियन मंडळी घोळक्याने उभे राहत असायची .एकदा अशाच एका सुट्टीच्या दिवशी मध्यरात्री जाग आली . शनिवार ची मध्यरात्र आणि रविवारची सकाळ यांच्या मध ला काळ होता. तशी जाग आली म्हणून खाली थोडावेळ पायी चालत फिरत रहाव या उद्देशाने लिफ़्टने खाली आलो .बराच वेळ तिथल्या मोठ्या पाण्याच्या टाकीच्या पायरयावरती बसून मोबाईल वरती गाणे ऐकत बसलो होतो . मध्यरात्र उलटून गेल्यामुळे तशी बाहेर कोणाचीच उपस्थिति नव्हती .
मात्र प्रचंड अशा मोठाल्या इमारतींच्या लाईट मधून आणि खाली पार्किंग मधल्या लाईट मधून दिवसांसारखाच प्रकाश तिथे जाणवत होता .समोरच्या बागेतील रेलिंग चा एक भला मोठा लोखंडी पाइप मधोमध वाकलेला दिसला . वरून काहीतरी अवजड सामान खाली पडून तो वाकला असावा असा अंदाज होता . त्याकडे दुर्लक्ष करून मग तिथे मी फिरत होतो .तेवढ्यात एकजण अंधारातून अचानक जवळ आला आणि म्हणाला की तुझा फ्लॅट नंबर कुठला ? तू कुठे राहतो ? इथे आता काय करतो ? असं विचारताच तो चौकीदार तर नाही ना याची खात्री केली व त्याच्या लांब उभा राहिलो . इतक्या रात्री इथे फिरत आहे तुम्हाला काय कळतं का काही काल काय झालं ? लागला त्यावर मी मानेनेच नाही असे उत्तर देत शांत उभा राहिलो . मग त्याला अजून एक-दोन जण येऊन मिळाली आणि ते सगळे मला सांगू लागले .ते सांगत होते की काल परवा इथे तुमच्या बाजूच्या बिल्डींग च्या वरच्या मजल्यावरून एकाने दुसऱ्याला धक्का देऊन खाली पाडले .त्याचे डोके या रेलिंग वर आपटुन तो मेला .डोक पार चेंदमेंदा झाल होत . सगळे जण खिड़कीतून तमाशा पाहत होते . पोलिस आले तेव्हा डेड बॉडी उचलून नेली . आता काल-परवा पासून बऱ्याच जणांना ते डोक नसलेल भूत इथेच फिरताना दिसत आहे . त्यामुळे आम्ही मुलं ग्रुप करून फिरत आहोत .आता इथे उभ राहू नको रूमवर जा आणि झोप .हे एकताच माझी थोडी उरलीसुरली झोप देखील उडाली आणि माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला . कशाला इतक्या रात्री बाहेर फिरण्याची हौस आली असे वाटू लागले .मग त्यातला एक जण दुसऱ्याला सांगू लागला की अरे हे तर काहीच नाही त्या समोरच्या बिल्डिंगमध्ये तर १ भूत रात्रभर खाली वरती फिरत राहतो . ती बिल्डिंग तयार करताना सिमेंट वर खाली कर णाऱ्या क्रेन खाली दाबून त्याचा मृत्यू झाला होता व त्याचे दोन तुकडे झाले होते . आता त्याचा एक तुकडा छतावर असतो आणि दुसरा तुकडा खाली फिरतो .
आता मात्र मला चांगलीच भीती वाटू लागली होती आता परत एकट्याने लिफ्टमध्ये चढून वर जायचे ते सतराव्या मजल्यावरती म्हणजे डोक्याला तापच होता .आता कसेतरी उसने बळ आणून लिफ्ट समोर उभा राहिलो. ती लिफ्ट नेमकीवरती कुठेतरी अडकलेली होती .लिफ्टचे ग्राउंड फ्लोर चे बटन दाबलं .खालीपर्यंत त्याचा जवळ येणारा मोठा आवाज मात्र मनात धडकी भरवत होता. दरवाजा उघडेपर्यंत त्याच्या आत मध्ये कोणी तरी आहे असेच मला वाटत होते .एकदा मात्र दरवाजा उघडल्यावर ती समोरच्या आरशात प्रतिबिंब पाहून मला थोडं हायसं वाटलं .त्यानंतर आत मध्ये शिरलो आणि वरती सतरा नंबरचा बटन दाबायचे की नाही असा थोडा वेळ विचार करू लागलो .मात्र थोडी हिम्मत करून मी ते बटन दाबलं आणि दरवाजा हळूहळू बंद झाला. ते एक ते सतरा मजल्याचा प्रवास इतका भयानक होता की जेव्हा लिफ्ट 17 व्या मजल्यावर आली तेव्हा मागे न बघता थेट रूमच्या आत मध्ये जाऊन मी शिरलो .
मोहन मुठाळ
thanks
see you again.
Comments