Pre clinical प्रोस्थो आणि setting रिएक्शन
दंत वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाला असणारा विषय म्हणजे डेंटल मटेरियल .दंत उपचारा संबंधित वापरली जाणारे काही विशिष्ट पदार्थ म्हणजे प्लॅस्टर ,स्टोन,इम्प्रैशन कंपाउंड, वैक्स इत्यादी पदार्थांची तोंड ओळख म्हणून हा विषय .दुसऱ्या वर्षाला असणारा विषय म्हणजे प्री क्लिनिकल प्रोस्थो . आता डेंटल मटेरियल आणि प्री क्लीनिकल प्रोस्थो या दोन्ही विषयांचे तास मागेपुढे असत ,त्यामुळे प्रथम आणि दुसर्या वर्षांच्या ओळख ही होणारच. त्यातही तिसऱ्या आणि चौथ्या वर्षांची ही प्रॅक्टिकल्स थेट क्लिनिक मध्ये होत असे आणि प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना तिथे जाण्याच काही विशेष कारण नसायचे .त्यामुळे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची तिसऱ्या आणि चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची भेट थेट कॉलेज बाहेर कॅन्टीनमध्ये किंवा होस्टेल ला. प्री क्लीनिकल प्रोस्थो विभाग म्हणजे तसा कौशल्य आधारितच .तुम्हाला तुमच्या पुस्तकीज्ञानाशिवाय किंवा पुस्तकी ज्ञानासोबत किती कलाकारी आणि कलकुसर करता येते याचाच हा विभाग .साधारण 30 ते 40 जण एक सोबत बसू शकतात अशी ही व्यवस्था .या विभागात अंतर्जातीय असलेली टेबल्स म्हणजे वर स्टील किंवा लोखंडी पत्रा असलेला ओटा आणि खाली लाकडी पाय असलेल फर्नीचर .८-१० लांबच लांब पण छोट्या आकाराचे असे टेबल ,त्यावर ठिगळ लगलेल्या गोदढी सारख्या हिरव्या किंवा लाल रंगाच्या मॅकिन्टोश शीट .त्या टेबल च्या बाजूला स्टील ची गोल ताट असलेली कुशन नसलेली सीट व ती सुद्धा सर्व बाजुनी फिरणारी .
कोणत्याही प्रकारची कुशन नसलेली स्टीलचे गोल ताट असल्यासारखी असलेली बैठक व्यवस्था का म्हणून असेल याच उत्तर नाहीच . बरेच वेळा उगच कुरकुर करणारी ही स्टूल कधी मधि आपली सीट सोडून द्यायची . मग ते स्टील चे गोल ताट धपकन पडू न मोठा आवाज गर गर होत असे .अशा सीट वर बसून राहणे ही देखील एक कला.
. कुशन असलेली सीट विभागात फक्त लेक्चरर यांचीच .यास्टुलांची उंची लहान-मोठी अशी करता येत असे . या टेबल यांच्या खालोखाल लाकडी पायांच्या मधोमध छोटेखानी लॉकर . त्यात पहिल्या वर्षाला आल्यानंतर २-३ जणांमध्ये एकत्र मिळून एखादी लोकर प्रदान केले जात असे . त्यात आपापले बाउल स्पैचुला वैक्स नईफ कार्वर ऐसे बारीक सारिक सामान म्हणजेच साधनसामग्री ठेवावी लागे .वरुन त्याला कुलुप असे . त्या कुलुप ची चाबी एकाकडे असे . गम्मत म्हणजे ज्या्च्या कडे ती चाबी असे त्याचे सामान नेहमी सर्वोत्तम असे . दुसऱ्या ने आनलेले नवीन सामान नकळत त्या कुलपति कड़े जमा व्हायचे . जुने खराब सामान मात्र इतरांना . मैग यावर उपाय म्हणून गुलमंडी मधे जाऊन ३ चाबी असलेले एक कुलप विकत घेतले जात असे . तेव्हा कुठे कुलपति करत असलेल्या भ्रष्टाचारावर अंकुश लागत असे .
या टेबलच्या मागून किंवा भिंतीला पाली सारखे लटकत आलेल्या रबरी नळयाही असत . टेबल वरती बर्नर सोबत त्या नळया पककया मित्रा प्रमाणे चिटकून असायचे . म्हणजे प्रत्येक टेबल वरती किमान चार ते पाच तरी बर्नर असत .दोन किंवा तीन जन सोबत मिळून काम करताना बारीक आवाज करत गप्पा चालत . मात्र यात बर्नर च्या जळत असलेल्या आणि डोळ्याने शक्यतो कमीच दिसणा रया फ्लेम मुळे एक प्रकारची अग्निपरीक्षा समोर येत असे . बरेच वेळा काम करीत असताना सोबत गप्पा मारत असताना चुकुन बर्नर च्या जवळ गेल्याने लांब केसाच्या मुलींचे केस जळत असत. त्याकडे कुणाचेही लक्ष नसायचे .मात्र थोड्यावेळानंतर काहीतरी जळण्याचा वास आल्यानंतर कोणाची तरी अग्निपरीक्षा पार पडली असे समजून येत असे .बर कधी कधी मुलींकडे मान वाकवून पाहत असल्याने मुल देखील या अग्निपथ च्या मार्गात बळी पडत .त्यामुळे शिक्षकांकडून वारंवार गप्पा कमी करण्याची आणि कामाकडे लक्ष देण्याची सूचना होत असे.
या विभागातच दुसरी गोष्ट प्लास्टर ऑफ पेरिस . पेरिस चा संबध असा होऊ शकतो ह्याची देखील जाणीव इथेच झाली . उलटी उघडी करून ठेवलेली पोती असत . त्यातून लागेल तेवढा प्लास्टर बाहेर काढला जात असे .याच्या बाजूला पाण्याचा कधीही बंद न होणारा नळ असे , खाली मोठे नेहमी ब्लॉक झालेले बेसिन असे . आणि मधात मोठा लाकड़ी टेबल . इथे मात्र बसायची व्यवस्था नाही .
प्रथम वर्षाला आल्यानंतर प्लास्टर ऑफ पॅरिस सोबत असा संबंध येईल अशी कोणतीच अपेक्षा नसते .पण या प्लास्टर ऑफ पॅरिस आणि पाणी याचे विशिष्ट प्रमाण घेऊन ते एकत्र करून मातीच्या गोळ्याप्रमाणे आकार देण्याची कलाकारी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना शिकावीच लागते .या गोळ्याचा मग जमेल तसा चौकोनी आकार देऊन ब्लॉक तयार करावा लागे . हीच काय ती परीक्षा . त्यातच मजा म्हणजे थोडं जरी कमी किंवा जास्त पाणी किंवा प्लास्टर झालं तर तो गोळा योग्यरितीने तयार होतच नसे.एका विशिष्ट रिएक्शन नंतर तो दगड़ा सारखा कड़क होत असे .नंतर थोडाफार आकार त्याला सेट झाल्यानंतर बाजूला असलेल्या लोखंडी ट्रिमवरती पाण्याच्या सोबतीने द्यावा लागायचा. बरेचदा त्याचं पाणी एकदम कमी व्हायचं त्यामुळे मोठा घासन्याचा मोठा आवाज यायचा किंवा बरेचदा पाणी इतका वाढायचं की अक्षरशः अंघोळ व्हायची .असा हा सगळा प्रताप . घासुन घासुन सराव आणि अभ्यास काय असतो ते इथे समजत असे .
तीसरी गोष्ट म्हणजे इम्प्रेशन कंपाउड . सुरुवातीला कड़क मात्र गरम पाण्यात टाकल्या नंतर मउ होणारा हा पदार्थ .याचा वापर करून मग स्वतःच्या हाताच्या अंगठ्याचा माप तयार करून त्याचं पीओपी मॉडेल तयार करणे हे देखील कर्म पार पाडव लागे . गुरु द्रोणाचार्य यांना स्वतःचा अंगठा देऊन गुरुदक्षिणा देणारा एकलव्य आणि आणि नंतर दंत वैद्यकीय विदयार्थि.
बरेच वेळा बाउल आणि स्पे्चुला हे एकाच रंगाचे आणि एकाच आकाराचे असल्याने गोंधळ होत असे . काही जण तर हातात स्वतः चा बाउल असताना देखील समोर दिसणारा नवीन बाऊल असला तर तोच माझा आहे असं म्हणायची सवय असणारे होते . त्याच्यासमोर आपला बाउल किंवा स्पेक्युला लपवून ठेवण्याची धडपड चालत असे . किंवा काही जण तर परमनंट मार्करने अक्षरशः नाव गोंदत . प्लास्टर ऑफ पॅरिस आणि पाणी मिक्स करताना मिश्रण पातळ झालं तर त्याचे शिंतोड़े पॉलिश केलेल्या बूटवरती पडायचे किंवा रूम वरती जाताना सकाळी कड़क इस्त्री केलेल्या कपड्यावरती ते उडलेले डाग पेंटर प्रमाणे घेऊन रस्त्याने जावे लागायचे .
या परीक्षेच्या वेळी मात्र अजून धमाल यायची परिक्षेच्या वेळी स्पॉट नावाचा एक प्रकार असायचा .या प्रकारात दंत उपचारात वापरातल्या वस्तू या टेबलावर ठेवलेल्या असायच्या .एकापाठोपाठ नंबर दिले जायचे, ओळखण्यासाठी पाच किंवा तीन मिनिटांचा वेळ देत असे. त्याला ओळखून त्याच्या बद्दल थोडक्यात माहिती लिहिणे असे हे चालायचे .
एकापाठोपाठ एक विद्यार्थी येथे रांगेमध्ये उभे असत आणि बेल वाजली की लगेच पुढच्या स्पॉटवर जाऊन त्याचे माहिती लिहायची असे .अशावेळी मुलमूली पैड पेन बाउल स्पेक्युला सोबत घेत असत कारण दुसरी परीक्षा लगोलग स्पॉट झाल्यानंतर ब्लॉक तयार करायची असे. अशातच कोणीतरी एकदा घाईगडबडीने स्पॉट माहिती लिहील्यानंतर त्याच्या हातातला बोऊल तसाच ठेवला आता खरा स्पॉट अतिशय लहान आणि छोटा असल्यामुळे मागच्या काही विद्यार्थ्यांनी लगेच दिसणाऱ्या बाउल विषयी माहिती लिहून काढली .परीक्षा झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर कुठले स्पॉट होते याची माहिती एकमेकांनकडून घेत असताना, एक स्पॉट बाउल होता असे जेव्हा काही जण म्हटले तेव्हा मात्र त्यांच्या चेहऱ्याकडे बघण्यालायक परिस्थिति होती .
या विभागशास्त्रात ब्लॉक तयार करण्याची प्रॅक्टिस करताना मला ब्लॉक येत नाही प्लीज मला एक चांगला ब्लॉक करून दे ना अशी आवडत्या व्यक्तीला आर्त हाक मारणारे असो किंवा दुसऱ्याचा कितीही चांगला ब्लॉक तयार होत असला तरी असा नाही असं कर म्हणणारे प्रेमविर असो ... अशी आणि ही सेटिंग करण्याची ताकद फक्त या विभागातच होती .
मोहन मुठाळ
Comments