Viva चा गोंधळ
जेव्हा आमची क्ष-किरण विभागात पोस्टिंग प्रशिक्षणार्थी म्हणून लागली होती तेव्हाचा हा किस्सा .त्या विभागात दातांचे एक्स-रे काढले जातात व त्या एक्स रे चा रिपोर्ट बघूनच मग इतर दातांचे उपचार करण्यासाठी तत्सम विभागात रुग्णांना पाठवले जाई.साहजिकच लवकर एक्स रे निघावा आणि इतर उपचार लवकर सुरू व्हावे ह्या विचाराने तिथे रुग्णांची गर्दी कधीही कमी होत नसे. काही रुग्ण तर केवळ एक्स रे काढून बाहेर दुसरीकडे उपचार करायला जात कारण तिथे एक्स रे कमी किमतीत निघत नसे . महत्वाचे म्हणजे सर्वात जास्त रुग्ण दाखल त्या विभागात व्हायचे ,साधारण रोज 100 ते 120 रुग्ण तपासून त्यातील ज्यांना एक्स ची गरज असेल त्यांना विभागात पाठवले जाई.सोमवारी तर हा गर्दीचा आकडा 150 पर्यंत जाई . इतक्या मोठ्या संख्येने आलेले रुग्ण डोक्याला आणि शरीराला बधीर करत .तसे बघितले तर त्या विभागात एक्स रे 'च्या दोन मशीन्स होत्या मात्र कधीकधी त्याही कमी पडत नाही .येणारे रुग्ण कधी खूप नवीन असत,त्यामुळे त्यांना लहान सहान गोष्टी समजत नसत यामुळे गोंधळात भर पडे .साधारण पणे एक्स रे शूट करून झाला की तो पुढील प्रक्रियेसाठी डार्क रूम कडे डेव्हलप आणि फिक्स करायला नेत . या मधात कधी कधी रुग्ण अगोदरच ती एक्स रे फिल्म उघडून पाहण्याची माकडचेष्टा करत त्याने ती फिल्म लाईट ला एक्सपोस होऊन खराब होत असे . सगळं पुन्हा पहिल्या पासून करावं लागतं असे .तसंच काही हुशार रुग्ण बरेच वेळा आल्यामुळे आणि चार-पाच वेळा पाहिल्यानंतर ते स्वतः दातांच्या एक्स-रे बद्दल बरीच माहिती गोळा करीत असत . एक्स रे फिल्म कशी पकडावी , एक्स रे मशीन कशी सुरू करावी कसे पकडावे यासारख्या साधारण गोष्टी प्रशिक्षणार्थी डॉक्टरला उशिरा कळत पुस्तकी ज्ञान असून देखील मात्र काही हुशार रुग्ण केवळ अनुभवाने यामध्ये पुढे असत .एक्स-रे काढण्यासाठी सकाळी नऊ वाजल्यापासून विभागात सुरुवात होत असायची .त्याला काही नियम होते . एका दिवशी एका रुग्णाचे जास्तीत जास्त २ एक्स रे काढत असत .त्याची वेळ साडे अकरा पर्यंत असे व साडे अकरानंतर एक्स रे काढणे बंद व्हायचे. मानतात ११:३० -१२:३० या वेळेमध्ये ते सकाळी काढलेले सगळे एक्स रे डेव्हलप आणि फिक्स करून ड्राय करायला ठेवले जाई. यातच एक तास लागायचा , साडेबारा वाजता जेवणाची वेळ होत असे व त्यामुळे बरेच कर्मचारी लवकर निघण्याच्या तयारीत असतात आणि हे सकाळी काढलेले एक्स-रे साडेअकरा ते साडेबाराच्या दरम्यान तयार करून ठेवले की ते रुग्णांना परत करायला दोन वाजता विभाग उघडत असे .ही नियमावलीचा विभागाच्या एकदम बाहेर सगळ्या रुग्णांना दिसेल या पद्धतीने लावलेली असायची तरी काही त्याकडे सपशेल दुर्लक्ष करून वागत .रुग्ण मात्र ओळखीने ,प्रेमाने ,रागाने जबरदस्तीने ,हुशारीने त्यांचे काम काढतच .एकदा असेच सकाळी एक्स-रे काढून झाल्यानंतर ते डार्क रूम मध्ये प्रोसेसिंग ला ठेवले होते नुकतेच जेवण आटपून आम्ही विभागातील टेबलवर बसलो होतो, बाहेरचे दार ओढून बंद केलेले होते आणि एक दोन लाईट बंद केल्यामुळे थोडासा अंधार पडलेला होता .असं केलं तर एक्स रे साठी बाहेर बसलेले रुग्ण आत येत नसत . ते बाहेरच बसून राहत . असाच एक रुग्ण सिविल ड्रेस मधला मध्यमवयीन माणूस क्लीन हेअरकट ,क्लीन शेव असलेला पायात चप्पल असलेला ,शर्ट पॅन्ट घातलेला आत येऊ लागला .त्याने हळूच बंद दरवाजा ढकलला .आमच्या पैकी एकाने त्याला हातानेच थांबा म्हटले तरीही तो आमच्या टेबल पर्यंत चालत आलाच .मला माझा एक्स रे हवा आहे असं तो म्हणाला . आम्ही मात्र त्याला इतरांना सांगतो तस दोन वाजता या तेव्हा एक्स मिळेल त्या अगोदर नाही असे नेहमीप्रमाणे सांगितले .त्यानेही ते न ऐकल्या सारख करून स्वतःहूनच समोर नंबर प्रमाणे ठेवलेल्या काही एक्स रे च्या गठ्ठयात मध्ये आपला एक्सरे शोधू लागला .तसं करताना तो सगळे एक्स रे एकत्र करत होता .त्याचं पाहून बाकीचे एक-दोन जण जे रांगेत नीटपणे बसले होते ते देखील उठून उभे राहिले आणि त्यांची पावले आत पडायला सुरुवात झाली .आता मात्र जो व्यक्ती एक्स-रे बघत होता त्याला आम्ही नियम सांगितला आणि बाहेर जाऊन बसा असे सांगितले .त्यावर तो म्हणाला की मी ऑफ ड्युटीवर आहे नंतर मला सुट्टी मिळत नाही त्यामुळे मी माझा एक्स रे शोधतो .आम्ही मात्र तुमचे बघून बाकीचेही आत येतील असआम्ही त्याला ठणकावून सांगितलं .मात्र त्यावर तो आता आवाज चढवुन मला माहित आहे की हे नियम तुम्ही किती पाळता आणि किती नियमाणुसर इथे किती काम होतं. आता मात्र सकाळी भरपूर झालेल्या रुग्णांच्या ताण डोक्यात गेला त्याचा हात पकडत आम्ही त्याला बाहेर दरवाजापर्यंत आणलं .नियमांची पाटी दाखवत त्याला म्हणालो वाचता येत असेल तर ही नियमावली वाचा आणि नसेल वाचता येत तर आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला सांगतो .त्यावर तो इतरांसमोर शरमला आणि पाय रागाने आपटत बाहेर निघुन गेला .आम्ही मग कामाला सुरुवात केली .दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे काम करत असताना एक जण कडक इस्त्री झालेल्या पोलिसांची खाकी युनिफॉर्म घातलेला वर्दीतला माणूस पॉलिश केलेल्या बुटांचा टपटप आवाज करत डिपार्टमेंट मध्ये कुणालातरी शोधत होता .कालचा तो सिविल ड्रेस मधला माणूस हाच आहे असं लक्षात आलं मग मात्र मी आणि माझा सहकारी डॉक्टर यांनी तोंडावरती मास्क लावला आणि चुपचाप आम्ही ऑफ ड्युटी झालो .
मोहन मुठाळ
More ebooks available on - Amazon.in
Click here to visit
Comments