दातावर ब्रिज किंवा कैप बसवून झाल्यानंतर नंतर रुट कैनाल ची गरज असते का ?
दातांची कॅप बसवल्यानंतर रूट कॅनाल करावी लागू शकते का ? बरेचदा दात खूप जास्त खराब झाल्याने तो मुळपासून काढून टाकण्यात आलेला असतो . नंतर जेवण चावता न येण्यासारखा त्रास सहन करावा लागू नये यासाठी फिक्स दातांची कॅप किंवा ब्रिज बसवल्या जातात . त्यामध्ये कमीत कमी तीन दातांची कॅप एकत्रित रित्या तयार करून ब्रिज म्हणून बसवता येते. ती काढून टाकलेल्या दाताच्या बाजूला असलेल्या आणि चांगल्या दातांचा आधार घेऊन नसलेला दात बसवता येतो .हा ब्रिज किंवा कैप हिरडी च्या वरती असते .यामध्ये आजुबाजुचे दोन्ही दात थोडे कापून काढून त्यावर सगळ्या बाजूंनी आवरण असलेली कॅप बसवता येते .जेणेकरून त्याचा आकार मोठा होणार नाही .हे आधार घेण्यात आलेले दात ब्रिज किंवा कैप बसवल्यानंतर देखील त्रास देउ शकतात कारण कैप बसविन्यासाठी त्यांच्यावरचा कड़क इनेमल सारखा भाग काढून टाकावा लागतो की जो थंड-गरम त्रासापासून दाताना वाचवतो .काही प्रमाणात कैप बसवल्यानंतर दाढ दुखण्याचा त्रास झाला तर औषधे घेऊन तो कमी करता येतो .मात्र कैप जास्त उंच बसली असेल तर आकाराने ती कमी करुन तो त्रास कमी करता येऊ शकतो .वरच्या किंवा खालच्या जबड्यातील कैप बसवताना एकमेकांवर ती योग्य रीतीने बसत नसतील तरी देखील दात दुखतो .अशा वेळेस गरजेनुसार कमी किंवा जास्त कैप एडजस्ट करता येऊ शकते. खूप कमी प्रमाणात या गोष्टी करूनही दाताना कॅप लावल्यानंतर काही त्रास होत असेल तर अशा वेळेस मात्र आधार घेतलेल्या दातांची त्यांची रूट कॅनल करणे हाच उपाय उरतो .मग दातांची कॅप काढून भुलीचे इंजेक्शन देऊन रूट कॅनाल च्या साह्याने दातांची सतत ठनकणारी नस काढून टाकण्यात येते व पुन्हा तीच अगोदर तयार असलेली कॅप तिथे बसवता येते . अतिसंवेदनशील रुग्णांमध्ये हा त्रास अवश्य आढळतो .अशा वेळी दातांच्या उपचारांचा खर्च वाढतो आणि त्यामुळे दातांवर बसवतांना डॉक्टरांकडून रुट कैनाल करून कैप बसवने योग्य की फक्त कैप हा सल्ला घेऊनच उपचार सुरू करावा .
Comments