जेवल्यानंतर दातांच्या फटितले अन्न साफ करताय ?
दातांमध्ये अडकलेले अन्न कशाने काढायचे ?वयोमानानुसार दातांच्या आजूबाजूला असलेले मजबूत जबड्याचे हाड ठिसूळ होत जाते ,त्याची ऊंची आणि जाड़ी कमी होत जाते आणि अगोदर निःसर्गत दातांच्या मधात कमी असलेली फट वयोमानानुसार वाढतच जाते .मग येथे मेथी पालक शेपु यासारख्या भाज्या किंवा खाल्लेले अन्न अडकण्याची शक्यता असते .जेवण झाल्यानंतर हे अडकलेले अन्न काढून टाकण्याशिवाय बरेचदा चैन पडत नाही .मग मात्र सेफ्टी पिन ,लोखंडी टोकदार वस्तु , अगरबत्ती ची काडी ,माचिस ची काडी ,पेन किंवा कधीकधी एखाद्या प्लास्टिकचे टोकदार रैपर यासारख्या गोष्टी वापरून ही दातांची घाण करायची सवय असते .मात्र यावर जर धूळ साचलेली असेल तर ही टोकदार वस्तू हिरडीच्या आत जाऊन बरेचदा तिथे इन्फेक्शन तयार करते . मग अशामुळे हिरडी वरती सूज येते आणि डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार करावा लागतो . यामुळे असे न करता दोन दातांच्या मधात अडकलेले अन्नकण साफ करण्यासाठी टूथपिक किंवा फ्लॉस चा धागा याचा वापर करावा . त्यांच्यामधल्या फटी नियमितपणे साफ कराव्यात जेणेकरून जिथे जंतुसंसर्गाचा धोका होणार नाही. हा डेंटल फ्लॉस कसा वापरावा याची देखील एक पद्धत असते ही पद्धत दाताच्या डॉक्टरांकडून समजून घेणे .चुकीच्या पद्धतीने फ्लॉस किंवा टूथपिक वापरत असाल तर त्यामुळे हिरडी ला ईजा होऊ शकते .
Comments