दाताची कैप पुन्हा पुन्हा निघुन येते ?



दातांवर बसवलेली कैप किंवा ब्रिज पुन्हा पुन्हा निघतो का ?
 दातांची ट्रीटमेंट करताना बरेच वेळा कमजोर दातांना मजबूत बनवण्यासाठी त्यावर नकली परंतु जेवण करताना ते दांत तूटणाऱ नाही यासाठी कैप बसवतात .उपचार झाल्यानंतर जेवण करने सोपे आणि अधिक चांगले होईल अशी अपेक्षा करून हा सगळा खर्च करण्यात येतो .मात्र बरेचदा ही फिक्स केल्यानंतर कॅप कशी वापरावी आणि कशी वापरू नये याची माहिती नसल्याने ती कॅप दर पाच सहा महिने झाले की निघून जाते . पुन्हा जेवणाचा करताना घास न चावता येण्याच्या त्रास मागे लागतो .असं का ?दातांची कीड खोलवर पसरल्यानंतर त्याच्या उपचारा साठी कैप बसवली असेल तर हा त्रास जास्त असतो . कारण त्या दातावर कैप बसवण्यासाठी दातांचा कड़क एनामेल सारखा  भागात कामात येत असतो . वेळेत उपचार न करणे किंवा अनेक कारणमुळे काही वेळेस हा कैप ला आधार देणारा भाग अगोदर कमी असतो . त्यामुळे त्यावर कैप नीट बसत नाही . सतत बदल णाऱ्या चावण्याच्या पद्धती मुळे देखील कॅप निघून येते .त्यामुळे कॅप  बसवतात तेव्हा डॉक्टरांकडून दातांवर दात बरोबर बसतात की नाही हे तपासून घेणे .कारण चावताना दातावर दात बसण्याची पद्धति नेहमी बदलणारी असु शकते .अस  असल्यास का कैप किंवा त्याच्या विरुद्ध असलेला दांत देखील  थोडा कापून काढावा लागतो . त्यानंतर कॅप निघून येत नाही .काही वेळेस जुन्या कैप असलेल्या दातांचा भाग निरनिराळ्या पद्धतीने कापून नवीन कॅप तयार करावी लागते .या दातांवर कॅप चांगली बसण्यासाठी काही विशिष्ट उपकरण वापरून पृष्ठभागावर ती काही खाचा खोचा तयार करण्यात येतात .मात्र यामध्ये जुनी  कैप वापरता येत नाही .कैप वारंवार निघू नये यासाठी कैप च्या बाजूने चिकट पदार्थ चिक्की ,चॉकलेट खाऊ नये किंवा कैप च्या आजूबाजू ला अन्न फसत असेल तर ते अन्न साफ करताना कैप ला धक्का न लावता अन्न साफ करावे . कॅप निघाल्यानंतर ताबडतोब डॉक्टरांकडून जाऊन बसून घ्यावी . 

Comments

Popular Posts