ओळखीतले अनोळखी किस्से....


 मुंबई येथे चिकित्सालयीन सहायक या पदावर काम करत होतो ....तेव्हा ची वेळ..!

तिथे काम करत असताना बरेचसे ओळखीचे चेहरे समोर यायचे, यातले काही चेहरे ओळख न दाखवणारे तर काही अगदी कुठेही कधीही भेट न झालेले मात्र विश्वासातल्या एका व्यक्तीचा  केवळ उल्लेख झाल्याने सर्वतोपरी मदत करणारे चेहरे .एकंदरीत औरंगाबाद येथून निघताना मुंबईला जायचे असे काही मुद्दामून ठरवले नव्हते . मात्र कधी कधी गर्दीत ओळखीच्या चेहऱ्यापेक्षा एखाद्या अनोळखी चेहऱ्यावर जास्त विश्वास ठेवावा वाटतो...इतका साधा सरळ हिशेब.

औरंगाबाद पेक्षा मुंबई बरं.....

इतकंच.....!



पहिल्या दिवसापासून हॉस्पिटल च्या आवारात पाऊलं पडताना खूप कामाचा मोठा अनुभव गाठीला बांधता येईल असं  स्पष्ट वाटतं होत. तिथे अल्पावधीतच काम करत असताना ओळख पटलेलं काही  मोजके चेहरे . बाकी ओळख व्हायला, ती झालेली ओळख समजून घ्यायला आणि ती समजून आलेली ओळख पटवून घ्यायला शेवटी  काय लागतं..?
रंग...रूप....भाषा...शब्द....
पद.... पैसा.... प्रतिष्ठा...... 
की लागतो तो फक्त
वेळ.....



तिथली डेंटल opd ची 
चिकित्सा लयीन सहायक ची  पहिली परीक्षा देण्यासाठी होती ती जागा .. हॉस्पिटलमध्ये आत प्रवेश केल्यानंतर म्हणजे cst च्या बाजूने आत प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताला लागते ती जागा.  नेहमीच असणारी अतोनात रुग्णांची गर्दी. त्यात आपापली काम करणारी डॉक्टर आणि इतर मंडळी . बाहेर वाट पाहत असलेल्या रुग्णांना आत बोलविण्यासाठी माइक समोर बसलेला एक चेहरा.... लक्षात आला ... पटकन लक्षात येईल असाच आणि पुढेही तसाच ..लक्षात राहीला....! तिथून पुढे परिक्षा वगैरे देऊन १००-१५० जणातून मोजके २०-२५ जण पास झालेत . त्यातून आम्ही ६-७ सोबत आलो ते दंतव्यंग उपचार विभागात . वेड्या वाकड्या वळणावर असलेल्या दातांना सरळ करणारा विभाग .पहिला किंवा दुसरा मजला असेल ...विभागाच्या बाहेर मोठ्या लाकडी पण सुंदर अश्या फळ्या वर लिहिलेली नाव ...स्वतःच्या मेहनतीने आयुष्यात पाहिजे ते मिळवून घेण्यात यशस्वी झालेल्या मोजक्या चेहऱ्यांची.  आत प्रवेश केल्यावर जाणवणारा लक्ख असा सूर्यप्रकाश... ओळीने लागलेल्या डेंटल चेअर ....त्यात दोन बाजू ....एका बाजूला आंतर वासीता यांचं काम सुरु तर दुसरी बाजू म्हणजे चिकित्सा लयीन सहायक यांचं काम करण्याची जागा .. जवळ एक लहान सा टेबल ...जोडीला लोखंडी सगळ्या बाजूने उघडी असलेली अलमारी . कधीही कमी न पडणारे बसायला असलेले स्टूल किंवा खुर्च्या .पाठीमागे विभागात असलेल्या प्रोफेसर  ,इतर स्टाफ ची जागा ,समोर ऑर्थो डोंटिक्स ची लॅब ..त्या लॅब मध्ये काम करणारे सर्वात अनुभवी असणारे लॅब technician. म्हणजे जेव्हा पासून हॉस्पिटल सुरू झालं तेव्हा पासून असलेले...वयानं आणि अनुभवानं मोठे .

 विभागात काम करणारे एक मामा...
देवा वर नितांत श्रद्धा असणारे ...हसतमुख... 
आवर्जून विचारपुस करणारे.. 
आणि  आयुष्यात अजून काहीतरी चांगले होईल या  भोळ्या आशेवर दररोज लोकल चा न चुकता प्रवास करणाऱ्या चेहऱ्यापैकी एक ..


Comments

Popular Posts