Skip to main content
आयुष्य...
जशी कोणत्याही रुग्णालयात गर्दी असते तशीच .... दररोज
दिवसा ....रात्री... कधी ही ...कोणत्याही वेळी..
त्यात स्त्री रुग्णालयाची जागा म्हणजे नेहमी पेक्षा थोडी वेगळीच....
एका जिवात दुसरा जीव ....
एका श्वासात दोन जीव जगवण्यासाठी धडपड....
दररोज ...नेहमी प्रमाणे ...रहाट गाड्या सारखे काम करणारे डॉक्टर
आज... उद्या ...परवा... सगळे दिवस सारखेच
'तुमच्या बाळाचे हृदयाचे ठोके जाणवत नाहीत आता '
'पण काल तर डॉक्टर म्हणत होते सगळं ठीक आहे आणि आज ...'
गाव खेड्यावरून लांब चा प्रवास करत
कधी बस ने ...
कधी मिळेल त्या वाटेने ...
मोठ्या शहरात येणाचा प्रवास
कधी तिथं पोहोचल्यावर
पायी चालायचे कष्ट
कधी सोबत
कधी एकट्या जीवाचाच प्रवास
कधी सगळे ठीक होईल हा विश्वास
कधी काही बरं वाईट तर नाही ना होणार ही धाकधूक
या प्रवासात मुका जीव सोबत
विना शब्द ....
भल्या सकाळी घरची सगळी काम उरकून
शेतातील काम अगोदर च्या दिवशी आटपून उद्याच्या आशेवर चाललेला प्रवास...
"बाळाचे हृदयाचे ठोके आता जाणवत नाही ..'
बाहेर रांगेने बसलेल्या सगळ्या जिवात जीव श्वास घेत आहेत ही जाणीव
आणि आता एका क्षणात दोन जीवाची ताटातूट तीही आपल्याच ...
अजून थोडं लांब ...
बाहेर पुढच्या आयुष्यात लहान पावलांनी येणाऱ्या स्वप्नाची चाहूल घेणारे आजी आजोबा
बाळाचे ठोके जाणवत नाहीत आज हे समजून आल्यावर आपल्या पोटीच्या पोरीला
आई बापाला पोर असल म्हणजे चं आई बापाच सगळे आयुष्य नसत
अस कसं पोटच्या पोरीला समजावून सांगावं ह्या घालमेलीत आई बापाचा
संवाद ....
Timed Pop-up Widget Sidebar
Comments