छाती वरचं ओझ....भाग पहिला :लाल
भाग पहिला :
लाल.....
रात्रभर तुफान सुरू असलेला पाऊस आता थोडा कमी होत होता .त्या पावसाने अगोदर पासून ठिकठिकाणी असेलल्या लहान मोठ्या खोल खड्ड्यांनी रस्त्याचा पार नकाशा करून सोडला होता . नेमका कोणता टाळायचा आणि कोणत्या नाही टाळला तरी चालेल याचा नुसता अंदाज...नकाशा वरच्या रस्त्याची काय अन् रस्त्या वरच्या खड्ड्यांची काय ....कथा ....एकच
ते तरी बर रात्रभर सुरू असेलल्या पावसाने त्याच अंग पार भिजून गेले होते. त्याच्या कपड्यावर लागलेला लाल रंग आता कुठं धुवून निघाला होता . ते तरी बर झाल ..एक काम कमी त्याच बाकी काय नाय ...
इतका वेळ पायाजवळ लपवून ठेवलेल्या धारधार चाकूने त्याला जखम होत होतीच ...मात्र आता समोर तुडुंब भरलेल्या नाल्यात आता तो फेकून दिला तरी चालणार होत. .असा विचार करत तो चालत राहिला....
क्रमशः
Comments