माझ्या दंतकथा : मामा मावशी चे अवतार कार्य २.०
असे लिहितांना बरेचदा औरंगाबाद मध्ये वैद्यकीय महाविद्यालयात ओरल सर्जरी ची मेजर ओटी ची केस प्री ओप तपासणी साठी जायची . मग तिथे त्या गाव खेड्यातील आलेल्या रुग्णाला सोबत ब्लड टेस्ट, प्रि अनेस्थेटिक साठी मेडिसिन सर्जरी वॉर्ड ला घेऊन जायचे योग यायचे . तिथेच एकदा कुठं तरी एक खाकी शर्ट घातलेली पाठमोरी आकृती दोन्ही हात कमरे वर ठेऊन उभी असलेली दिसली. Please dont call me मामा अस चक्क embroidary करून लिहिलेली शब्द शर्ट च्या मागे स्पष्ट अशी नजरेस पडली . एरवी कोणतेही संबंध काय ओळख पण नं देणारी नुकतीच लागलेली रेसिडेंट म्हणून कामाला लागलेली आहे शेंबडी पोर सोर यांना धमकीवजा एका न मानलेल्या मामा ची प्रेमळ वार्निंग. कामापुरता मामा बनविण्याचे किंवा बनण्याचे स्वप्न मग रुग्णाचे असो का डॉक्टरांचे ते मात्र बघता क्षणी तोडणारे
मामा ...
एरवी सगळं डिपार्टमेंट चे काम आवरून सावरून फावल्या वेळात देवाच नाव जपणारी ते दररोज नित्य नेमाने लिहून काढणारी मावशी पण याच वर्गातील. तिचे ते राम राम लिहून झालेली कागद मोठ्या अभिमानाने समोर करायची. मग शनिवारी हाफ डे असेल किंवा महिन्याचा वॉशिंग डे असेल तेव्हा तिचे ते पुण्याचे हिशोब मोजताना मजा यायची . सगळी नावं गिणती करून खाली एक एक पानावर टोटल लिहून देण्याची जबाबदारी आमची . मग दिवसेंदिवस वाढत जाणारे ते राम नामाचे आकडे ऐकून त्या मावशीला बहुतेक सुखच मिळायचे . आणि परत काम करायला जणू काही शक्ती मिळायची. काम आणि राम ह्या गोष्टी पलीकडे त्या मावशीचा जीव कशातच अडकला नव्हता . सगळे आयुष्य दवाखान्यात पांढरे पडदे पांढऱ्या लाद्या पांढरे टेबल क्लॉथ करताकरता तिचे केस आता बरेच से तसेच पांढरे होत आलेले होते .. सहा दोन महिन्यात रिटायर होऊन जाणार असे ती नेहमी बोलायची .
तसे बघता वरच्या मजल्यावर पाण्याचे वॉटर कूलर नसायचे . ना पहिल्या ना दुसऱ्या . ते असे का याचे गणित नव्हते ? बरं ते वॉटर कूलर नेमके सगळ्यात खालच्या मजल्यावर.
आता आकडे आणि मावशी यांचा असा हा संबंध असू शकतो, वयो माना नुसार बदलू शकतो याची प्रचिती आली ती पुण्यात . कोविड मध्ये काम करताना आता ३-४ महिन्या पासून असलेले आमचे बस्तान रुग्णालयाच्या आवारातून काढून बाहेर म्हंजे शाळा कॉलेज सभागृह या सारख्या ठिकाणी आले होते . अशाच एका केंद्रावर असताना ह्या मावशी च्या रूपाचे परत नव्याने दर्शन घेऊन झाले . तशी बघता काम सुरू असताना काही त्रास न देणारे कर्मचारीच खरे काम करत असतात असे आता इतक्या अनुभवाने गाठीशी आले होतेच . तशी ही मावशी . दररोज डुटी वर येणारी तेही न चुकता .. आली की चुपचाप लांब दूर एक खुर्ची घेऊन बसणारी मावशी ..ना कधी जवळ आली ना दूर गेली... ना सुट्टी साठी मागे लागत बाकी मंडळी सारखी गोड बोलून ना कधी उगाच काहीतरी बडबड म्हणून इतर कुणा सोबत गप्पा मारत लाव्या दिव्या ही बसली नाही
. महिन्यातून एकदा मात्र ही मावशी आठवणीने चॉकलेट्स प्रेमाने खाऊ घालायची. तेही सगळ्या स्टाफ ला. बरेच वेळा विचारून बघावं की कशा साठी हे गोड मात्र, तिच्या च नियमाने वागत आम्ही कधीही कुठेही केव्हाही बोलचाल सुरू केली नाही . आता मात्र बरेच दिवस झाले की ही नेमकी दर महिन्याला नियमाने गोड खाऊ घालते ते का याचं कारण शोधायला आता आम्ही सुरुवात केली . नवीन रुजू झाल्यामुळे आम्हाला ही गोष्ट जरा उशिरा मात्र खात्रीशीर अधिकृत संकेत स्थळावर वरून माहिती झाली ती अशी..
. रोज केवळ खुर्ची टेबल वर बसून ही मावशी पेन आणि डायरी सोबत खेळत बसायची ... ती म्हणजे आकड्यांचा खेळ ...अर्थात मटका .. नेमका पगार झाल्या त्या दिवशी महिन्यातून एकदा जिंकले म्हणून तोंड गोड करायची ... झालेला पगार आकड्यात लावून कधीतरी जिंकले म्हणून आपल्या मानलेल्या भाच्या भाचीना प्रेमाने खाऊ देण्यात सुख मानणारी ही पण एक मावशी...
Comments