प्रेमाचे भूत


Glenda दोन भावंडातील एक बुटकिशी पोरगी. दुसरा एक मोठा भाऊ. तो मात्र उंच . दोघे ही दिसायला गोरे, पांढरे सुभ्रच... भुतं असतात तशीच म्हणा ना..अर्थात सुंदर म्हणा काही हरकत नाही . ही बुटकिशी पोरगी शिकली लहान असताना ती गर्ल स्कूल ला . पहिली ते दहावी . बॉईज स्कूल ची इमारत ती ही बरीच लांब. मात्र मुल कशी दिसतात राहतात वागतात याचे हिला जाम आकर्षण. हिला शाळेत तश्या कुणीच मैत्रिणी नव्हत्या.. इतर मुलीसारखं गप्पा मारणे , खेळणे हिला म्हणे जमत नसायचे . हीच सगळे लक्ष बॉईज स्कूल कडेच. कधी या गर्ल स्कूल मधून बाहेर पडू असे तिला नेहमीच वाटायचे. मुलांना बोलावे त्यांच्या सोबत फिरावे मैत्री करावी असे तिला लहान पणापासून स्वप्न पडायचे . बरं तशी हीची आई त्याच गर्ल स्कूल मधे हेड मास्टर आणि वडील गोव्यात मोठे डॉक्टर. आपण मोठे होऊन दुबई सारख्या देशात परदेशात फिरावे असे तिला वाटत असे मात्र सोबत कुणीतरी मित्र किंवा नवरा च. ना मैत्रिणी ना नातेवाईक . 
बरं दिसायला ही इतकी गोड की पाहून कुणी म्हणणार नाही इतकी खोडकर आणि आगाऊ. हिला एकदा कुणी मोठ्याने जवळ प्रेमाने लाड लाड घेतले की त्याची पाचवी पुजली च म्हणा हिने . त्याला किंवा तिला खोड्या करून करून त्याच्या नाकी नऊ आणायला हिला मजा वाटायची ती लहानपणा पासूनच.परत कुणी हिच्या जवळ येण्या पूर्वी एकदा विचार करायचे. शाळेत पण तस आणि घरी पण . बरं हीचे तसे वाढदिवस वर्षात दोन . एक डिसेंबर ला संता क्लाउस च्या नाताळ सणात आणि दुसरा सेंट व्हॅलेंटाईन च्या व्हॅलेंटाईन च्या महिन्यात . केवळ शाळेत दाखला मिळावा म्हणून वर्ष दिवस महिने मागे पुढे करत दुसऱ्या जन्माची केली गेलेली खटाटोप . जीव एक आणि जन्मदिवस दोन ..


जशी जशी ही मोठी होत गेली तशी तशी हीची हौस काही फीटत नव्हती . दहावी बारावी ला मात्र हिला कॉलेज मध्ये आयुष्यात पहिल्यांदा पोर जवळून बघायला भेटली . ती दोन वर्ष मग Glenda निव्वळ ढकलत ढकलत पास झाली. मात्र तरी तिचा उत्साह तसाच होता . आयुष्य जगायचे ते भरभरून , मन मारून कशाला अशी फिलॉसॉफी. घरच्यांनी हिला पैसे भरून डॉक्टरकीला महाविद्यालयात ऍडमिशन घेऊन दिली मात्र तरी तिचा पाढा तोच. बे एक बे च्या पुढे तिची अवस्था आणि अपेक्षा नव्हती . जगात फक्त दोन जाती बाई आणि माणूस . बाकी काही नाही...अशी समजूत असणारी ..अशी ही आपली तुमची आमची सगळ्या ची जगमान्य मैत्रीण Glenda .. आणि हीची ही स्टोरी ..

Comments

Popular Posts