माझ्या दंतकथा: kitne आदमी थे ?


कितने आदमी थे?

सरदार दो आदमी थे

वो दो और तुम तीन...
फिर भी खाली हाथ ......
 

गब्बर असलेल्या सरदाराने पगारावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना टार्गेट पूर्ण झाले नाही तर त्याच पगारातून विकत घेऊन खाल्लेल्या मिठाला तरी जागं रहा असा हा सूचना देणारा शोले तील फेमस डायलॉग. बरं मूळ मुद्दा असा की आता लसीकरण सुरू होऊन १५ दिवस झाले असतील बहुतेक जानेवारी पासून . COVID पहिली ची लूट sorry माफ करा COVID ची पहिली लाट आता ओसरली होती . दुसऱ्या लाटे च्या पार्श्वभूमीवर आता देशपातळीवर आणि युद्ध पातळीवर पण COVID टेस्टिंग आणि लसीकरण मोहीम आखली गेली होती . या मोहिमेत पहिल्या टप्प्यात hcw म्हणजेच हेल्थ केअर वर्कर उदाहरणार्थ डॉक्टर स्टाफ नर्स ब्रदर रुग्णालयात असलेले अधिकारी कर्मचारी यांचे हे लसीकरण लाभार्थी म्हणून नाव नोंदवून घेतले होतेच . अगोदरच चीन सारख्या विश्वासपात्र नसलेल्या देशातून आलेला आजार बघता त्या वरच्या लसीला किती विश्वासात घ्यायचे आणि घेतले तरी का म्हणून आम्हीच अगोदर टोचून घ्यायचे असे विचार करणारे आपल्या पैकी बरेच जन गण मन चे साक्षीदार . त्यापेक्षा ही लस अगोदर ज्यांना दिली आहे त्यांना बघू या ...काही झाले नाही तर पुढं आपल्याला आरामात घेता येईल कधीतरी...घाई कशाला ? तर असा काहींचा विचार ...

त्यातही medically compromised असलेल्या स्टाफ ला सगळ्यात जास्त भिती होती ती AEFI ची. घेणं न देणं अन् icu ला भरती होन अशी गत व्हायची . म्हणून सगळ्या कर्मचारी अधिकारी वर्गाची चाललेली टाळा टाळ. मात्र आता लसीकरण झाले आहे असे जोपर्यंत certificate जमा करत नाही तोपर्यंत पगार काही निघणार नाही असे मामा चे पत्र लेखाविभाग कडून पोच येईपर्यंत पहिला टप्पा काही पूर्ण होणार नाही अशी खरी परिस्थिती. 

आता आमची रुजू होण्याची वेळ नेमकी हीच . मी आणि लातूर च्या अजून एक डॉक्टर . आमची नेमणुक झाली ही लसीकरण केंद्रात . सुरवातीचे काही दिवस थोडा डोक्याचा भुगा झाला मात्र vaccine, AEFI, HCW , FLW , certificate, beneficiary, reporting अश्या शब्दाचं वादळ येण्या पूर्वीची शांतता ही तशी बरी होती . लसीकरण केंद्रात ३ डॉक्टर , २ डेटा एन्ट्री ऑपरेटर, ४ स्टाफ नर्स , २ मामा मावशी असा जवळपास कर्मचारी वर्ग होता . वेळ तशी ९ ते ५ चीच. विभागातील इतर सर्व प्राथमिक उपचार केंद्र डीस्पेन्सरी रुग्णालय शासकीय असो की खाजगी याचं लाभार्थी म्हणून मोहिमेत नावनोंदणी योगदान सुरू होत .

सगळ काही दिवस सुरळीत होत . मात्र पहिल्या टप्प्याच्या १०० टक्के लसीकरनाचे उद्दीष्ट साध्य होत नव्हते . दुसऱ्या टप्पा सुरू होण्या अगोदर Target कसे पूर्ण करावे याचा विचार करणारी सरदार मंडळी आणि अन् आम्ही ...असच एक दिवस आम्ही सगळे शांत निवांत हवा खात बसलेले असताना रुग्णालयाचे कुणी तरी उच्च पदस्थ अधिकारी लसीकरण सभागृह असलेल्या त्यांच्याच ऑफिस चा काही भाग जो आहे तिथे येऊन दरवाजात उभे राहले. लॅपटॉप वर गाणे ऐकत बसलेला मी, फोन वर कुणाशी तरी बोलत असणारी एक स्टाफ नर्स , दोन्ही डेटा एन्ट्री ऑपरेटर आपल्या कॉम्प्युटर समोर ठेवलेल्या खुर्च्या सोडून कोपऱ्यात गप्पा मारत बसलेले, मामा मावशी यांच्या चिकटून बसलेल्या दोन्ही रिकाम्या खुर्च्या या सगळया कडे त्यांची नजर गेली.

  तसे हे अधिकारी नेहमीच लक्ष ठेवून असायचे मात्र आता जरा अगोदर पेक्षा कमी कमी होत चाललेले लसीकरण त्यांचे daily report त्यांच्या कानावरून जात होतेच . मात्र आम्हाला असे बिन कामी फुल्ल अधिकारी लेट पगारी पाहून बहुतेक त्यांना दया आली असावी , म्हणून आत येण्याचे कष्ट ना त्यांनी घेतले ना आम्हाला दिले. 

बरं पहिल्या टप्प्याचे बाकी उरलेलं लाभार्थी काही पायरी चढायला तयार नव्हते त्यात आमचा काय दोष ? बरं ऐका तर काही HCW म्हणजे हेल्थ केअर वर्कर night शिफ्ट मुळे लसीकरण मोहीम मध्ये सहभागी होता येत नाही असे उगाच पोकळ बाता मारत असायचे . त्यात खरे कमी खोटेच जास्त होते . 


वेळेचं कारण पुढे आल्यावर आता आमची duty लसीकरण ला इच्छा नसणाऱ्या सीनिअर HCW साठी रात्री ८ पर्यंत सुरू झाली तो विषय वेगळाच .त्याने बळेच काही लाभार्थी दंड थोपटून खुर्ची वर बसायला तयार झाले . असे करत करत आता पहिला टप्पा संपत फेब संपून मार्च येण्यावर आला


 .असा एक दिवस तो लक्षात राहिला तो या साठी . का कसे कुणाला कुणाचं कळणा पण लसीकरण झाले मोजके ५-६ तेही दिवसभरात दोन्ही शिफ्टला. बरोबर त्या दिवशी ते अधिकारी आज मात्र आत येऊन लसीकरण लाभार्थी चे रजिस्टर चेक करून पाहू लागले .

 आणि नाकावरून घसरून खाली आलेला चस्मा तसाच ठेवून आमची डोकी मोजण्यात गुंतले . आम्ही जवळपास १० जन आणि लसीकरण झाले ५ फक्त . तेव्हा त्यांनी प्रश्न केला ? किती झाले ? आम्ही शांत होतोच . त्यातला त्यात मावशीने हळूच ५ आकडा सांगितला. मग ते अधिकारी सगळया कडे नजर टाकून पुढचा प्रश्न विचारू लागले . आणि तुम्ही सगळे किती आहात ? आम्ही मात्र सगळे शोले चा गब्बर ची आठवण काढत मना मनातल्या का होईना पण त्या परिस्थितीत पण हसू लागलो होतोच ...

Comments

Popular Posts