एमपीएससी aspirants: Saam rajya




नाथा सांगा मले नेमक सुख काय असतं
कुठे जाऊन पाया पडू म्हणजे future दिसत

हात जोडू डोक ठेवू तूच सांग फक्त 
पण दिसत तस नसत म्हणुन जग फसत

मेणबत्त्या अन दिवे लावून कुठं काय भेटत
झोल होतात करून म्हणून देव दिसत

देवा देवा म्हणुन कुठं काय शिजत 
सांगशील का नाथा मले सुख काय असतं


याला लूट अन् त्याला मार सगळ अस असतं
देवा नाथा म्हणुन भलतचं भारी असत


उसकी टोपी इसके सर अस गणित असतं
Election आल की तिकीट घशात असत

मग मात्र कुणाला कुणाचं काही नसत
दाम करी काम यातच गेम असत

चार दोन पार्ट्याच डीलच अस असत
बाकी गेले उडत असच शेवटीं असत

पांढरी गाडी पांढरे कपडे सगळ स्वच्छ नसत
ब्लॅक चे white अस change असत

महान माझा देश म्हणत सगळेच इथ पचत
देशावर आले की स्वार्थाच सुचत

सिस्टम मध्ये सगळ्यांना खर इथ खुपत 
अन् राजा राजा म्हणत खोटं शेवटीं खपत

टीव्ही वर paper वर बाकीचं काय असत 
चोरांचे साम राज्य इथे फक्त दिसत


पॉवर आणि पैसा यावर सगळ ठरत
विश्वास गेला पानिपतात हेच बाकी उरत

शिक्षणाचं इथ कुणाला काय नसत 
खोके च्या खोके भरले की याचं पोट भरत

देवा देवा म्हणत हेच सुरू असत 
नाथा नाथा म्हणत काय भारी असतं

धंदा बिंदा नोकरी बिक्री याचं काय असत
अस दादा भाऊ ताई याचं मस्त असत

याला लाव अन् त्याला काढ हेच धोरण असत
सांग मला देवा खोटं काय असत
सांग मला राजा खर काय नसत


जातीपातीच राजकारण गल्लोगल्ली असत 
आपण सगळे भारतीय खर अस असत?

वरून खाली खालून वर सगळंच अस असत 
काय शहर अन् काय गाव असच चलन असत

पाणी नाय लाईट नाय तरी बिल असत
अन् दिव्या खाली अंधार म्हणुन जग म्हणत

बँकाच लोन च खर च काय असत
Security च्या नावा खाली बरच बर असत 

लोणच्याच लोण च खरचं कस असत 
भोळ्या नाथा सांग मले सुख काय असत 


पैसे फेकून पुरस्कारान घर सजत
चार दोन लोकांसमोर मोठपण शोभत

सोन्या चांदीचे देव अन् गावभर तंटा
One two का four भाई समोरच्याला घंटा 

सांग मले राव सुख काय असतं
सांग राजा मले खर कायच असत

Darling प्रेमाचं नाटक सगळी कडेच असत 
इकडे यार तिकडे प्यार असच लफड असत

पापाच पुण्याचं म्हणुन तर असत 
सांगा मले कुणीतरी सुख काय असत 
देवा देवा करत लय भारी मस्त

झोलझाल कारभारात असच चित्र दिसत
राजा काय प्रजा काय राज्य असच असत

चुकीचं बरोबर इथे अस असत
Pass या fail असं कुणी नसत 

कुत्र्याच जगणं सगळ कसं असत
धरलं तर चावत तर सोडलं तर पळत 

इथ देणं घेणं कुणाला कुणाचं नसत 
दुनियादारी मध्ये आज हेच फीट बसत

घर गाडी बंगला बायको पोर सगळ कस मस्त
राजा राजा करत सगळ करा फस्त

३g ४g ५ g सगळ कस must
Smartphone च्या नावाखाली टाईम नुसता waste

ढीग भर फोटो वर फिल्टर च असत 
Deta beta गेला चुलीत status असच असत 

सांग मले देवा खर काय असत 
सांग मले देवा सुख काय असत 

राजा राणी राज्य खरच काय असत
नवा गडी नवा राज अन् राजकारण फक्त 

नवा गडी नवा राज राजकारण फक्त...







Subscribe  YouTube channel : Dr mohan muthal  



like comment share

thanks

see you again.

Timed Pop-up Widget Sidebar

Need help ?

Chat with us on WhatsApp!

Start Chat

Comments

Popular Posts