तुझ्या माझ्या स्टोरी च कस काय हाय
गावभर शोधून बी गावणार नाय
तुझ्या माझ्या पिरती ची चव कशी हाय
गाव रान दूध अन् दुधाची साय
तुझ माझं कधीतरी जमतंय काय
राना मधी समदी चर्चा च हाय
तुझ्या माझ्या इश्काची गोम अशी हाय
दिसली लोकाला पण गावली नाय
तुझ्या माझ्या मैत्रीची गोष्ट कशी हाय
झाडावर पाखरू अन् सावली हाय
तुझ्या माझ्या नात्याचा धागा कसा हाय
कपाशीचे बोंड अन सुत जस हाय
तुझ्या माझ्या भेटीची आठवण काय
झाडा च्या खोडावर खूण जशी हाय
तुझ्या माझ्या गावाचं कस काय हाय
रातभर गोंधळ अन् जागरण हाय
तुझ्या माझ्या शेताच कस काय हाय
पावत्या दोन अन् इसार एक हाय
तुझ्या माझ्या स्टोरी च फायनल काय हाय
देवाची पायरी अन् नारळ एक हाय
तुझ्या पोराचं पुढं काय हाय
गावची शाळा अन् zp हाय
Comments