stop child abuse
अमल कुणाचा नेमका
या अंधाराच्या शहरात
अत्याचाराची सीमा नाही
भ्रष्टाचार्यांच्या बाजारात
इज्जतीचा पोरखेळ
फक्त श्रीमंताच्या दारात
वंचितांची अभ्रू
प्रकाशाच्या आधारात
न्याया साठी लढा
अरुंधतीच्या पदरात
बाकी डोंगर पोखरून उंदीर काढणे
जाहिरातींच्या पेपरात
ताका पुरत रामायण
खुशामतीच्या हिशोबात..
आग सोमेश्वरी बंद रामेश्वरी
आंधळ्याच्या दरबारात ...
देखल्या देवा दंडवत
निवडणुकी च्या कार्यक्रमात..
राजाची दिवाळी रोजच
कार्य कर्त्या च्या गोंधळात ...
Comments