Hostel आणि दूध का कर्ज - कोजागिरी special
होस्टल ला आल्यापासून सतत कोणत्या आणि कोणत्या सिनिअर ने आवाज देऊन काम सांगण्याची सवय आता चांगलीच ओळखीची झाली होती .
अतिउत्साहीपणा आणि आगाऊपणा असे अंगी असलेले लुप्त आणि सुप्त गुण हॉस्टेल वरती अधिकच निखरून येत .त्यात बाहेरून अतिशय सुंदर वाटणारे होस्टेल चे वातावरण जवळचे वाटत असायचे. त्यातच कोजागिरी, गणपती उत्सव, थोर महा पुरुष यांची जयंती ,पुण्यतिथी ,स्वतंत्रता दिवस, प्रजासत्ताक दिन असे अनेक उपक्रम एकत्रितपणे साजरे केले जात .
Follow on telegram channel
प्रसंगी त्यासाठी काही वेळा वर्गणी देखील गोळा केली जाई. अथक परिश्रम किंवा ढोर मेहनत करून काहीही म्हणा या जमलेल्या वर्गणीतून गणपतीची मूर्ती , प्रसाद, डेकोरेशन , इतर सामान रांगोळी ,कोजागिरी साठी लागणारे दूध हे गुलमंडी मध्ये चक्कर मारून आणले जाई.
गुलमंडी मध्ये एकत्र फिरताना सुपारी हनुमान , सिटी चौक परिसर फिरतांना छान वाटे, एका रांगेने असलेली गजबजलेली दुकाने नेहमीच गर्दीची ठिकाणे असत.
होस्टेलच्या मागच्या बाजूला असलेला नदीम भैय्याच्या दुकानापासून एक गल्ली सरळ गुलमंडी कडे निघत असे. त्या रस्त्याने शनिवारी-रविवारी इतर कधीही न दिसणार्या मुलींच्या चेहऱ्यांची गर्दी देखील असायची .
Read more: बिबी का मकबरा आणि कैरी
इतर वेळी कधीही टेरेस वरती जाण्याची परवानगी नसताना कधीतरी ही गच्चीची जागा कोजागिरी सारख्या सामूहिक कार्यक्रम पार पाडण्यासाठी साठी उघडली जाईल .या कुलपाची किल्ली होस्टेल वरच्या मामांकडे असे .
गिझर चालू-बंद करणे ,पाण्याचे नळ आल्यानंतर टाक्या भरून घेणे इत्यादी कामेही मामांची होतीच. कोजागिरी आली की ती साजरी करण्यासाठी मग कधीतरी टेरेस निवडले जाई तर कधी खाली ग्राउंड वरती ती साजरी केली जात असे .
दूधडेअरी वर जाऊन दोन दिवस अगोदरच खूप सारे लिटर दूध , मसाला आणि इतर वस्तू देखील आणून ठेवल्या जातात .त्या साठीची वर्गणी सात दिवस अगोदर जमा केली जात असे .दूध पिण्यासाठी ग्लासची व्यवस्था तशी होस्टेलला नेहमीच असायची, ग्लास चा विषय होस्टल ला नेहमीचा असल्याने निराळ्या प्रकारची छोटी-मोठी ग्लास तिथे सापडायची .
मग वेळ प्रसंगी ते ग्लास कोणत्या रूमच्या कपाटातल्या कोणत्या खाण्यात सापडतील याची ही खडानखडा माहिती असायची .
दूध घट्ट करण्यासाठी मोठं भांड ,मोठा चमचा आणि गैस ची शेगडी ही भाड़े देऊन किंवा मेस वाल्याकडून उधार आणली जाई. हैलोजन सारखा मोठा लाईट लावून सीनियर जुनियर मंडळी तयार असायची .
काही जुनियर मंडळी या कार्यक्रमात पुढाकाराने पुढे आलेल्या असताना काही जूनियर उगाचच तू लय भारी लागून गेला काय अस म्हणून फुकट नखरे दाखवत असत . एकत्रितपणे साजरा करत असल्याने यामध्ये खूप मजा येत असे .
हेही वाचा : वाह हाच चहा हवा
दूध गरम करून घट्ट करून त्यात काजू बदाम किस्मिस दूध मसाला इत्यादी टाकून झाला की एक एक दुधाचे क्लास जूनियर सीनियर पुढे मांडत .या सगळ्यांमध्ये कोणता ज्युनियर कसा काम करीत आहे किंवा कोणता ज्युनियर कसा काम टाळत आहे याकडे देखील सिनिअर चे बारीक लक्ष असे .
दूध पिताना एखाद्या सीनियर ला चार ग्लास मिळाले आणि आम्हाला तीनच कसे मिळाल असे मजेशीर प्रश्न देखील जुनियर ला विचारले जात .मग उरलेल्या दुधामध्ये ग्लास चा हिशोब मॅनेज केला जाई, कधीकधी जूनियर ला स्वतःचा दुधाचा ग्लास देखील देऊन हे होस्टल च्या दुधाचे कर्ज चुकवावे लागे .
कधी कधी तर दोन तीन दिवस सतत परिश्रम किंवा ढोर मेहनत काहीही म्हणा करून पण अर्धा दुधाचा ग्लास देखील नशिबात आणि ओठि येत नसे. अशा वेळी एखाद्या सीनियर ने सरतेशेवटी इतरांशी भांडून ऑफर केलेला दुधाचा ग्लास म्हणजे अमृततुल्य वाटत असे .
जवळ पास सगळं दूध पोटातच बसलेल असतानाच माझ्या रूम वरती दोन दुधाचे ग्लास आणून ठेव अशी धमकीवजा प्रेमळ सूचना देखील काही सिनिअर देत किंवा मी रात्री बाहेरुन आल्यावर दूध पाहिजे संपल तर बघ अशी आर्डर ऐकून मग ते दुधाचे पार्सल भरलेल्या टेरेस वरती लपून-छपून नेताना कॉरिडोर मधून किंवा पायऱ्या उतरताना कुणी पाहत तर नाही ना अशा गडबडीत योग्य ठिकाणी रूमवरती नेऊन ठेवले जाई.अशा वेळेस होस्टल वर काम करणाऱ्या मामांना देखील दुध प्यायला हक्काने बोलावले जाईल.
अशा या प्रसंगी वर्गणी गोळा करताना खूप मजा यायची , ही वर्गणी गोळा करण्याचे काम ज्युनियर ला मिळून करावे लागे. वर्गणी साठी रजिस्टर किंवा वही ठेवावी लागे .
Read also : माझ्या दंतकथा
ती कधीही कोणताही सीनियर ज्युनियर कडून तपासून पाहू शकत असे .त्यामुळे त्यामध्ये कोणतीही चूक अक्षम्य होती. वर्गणी गोळा करताना पहिल्यांदा वर्गणी कोणी दिली त्याचे नाव पाहिले जाईल किंवा एकमेकांशी पक्की ओळख असल्याने पहिले घेऊन दाखव त्याच्याकडून आणि मग मी देतो असे सांगून दोस्ती दुश्मनी देखील काढत .
काही सीनियर रूम च्या मध्ये जूनियर वर्गणीसाठी आल्यावर त्याला खुर्चीवर बसायला सांगत ,एरवी कधीही कोणत्याही परिस्थितीत उभे राहण्याची सवय आणि नियम असलेल्या जूनियर ला सीनियर ने बसण्यासाठी सांगितले म्हणून जूनियर चे मन भरुन येत असे .
मग पेन आणि वही काढून त्यात माझं नाव लिही असं सांगितल्यावरती जूनियर ला आपल्या नावे एक वर्गणी जमा झाली याची खुषी काही काळ असे .कारण नाव लिहिल्यानंतर पैसे नंतर देतो असे म्हटल्यावरती आता हे पैसे जर मिळाले नाही तर ते आपल्या खिशातून द्यावे लागणार या विचाराने खाडकन जागा उभा होत असे . सरळ रूमच्या बाहेर निघुन जाने असा एकच मार्ग उरत असे .
असे सीनियर ने स्वतःहून नाव लिहिलेले असताना ते खोडले तर समजायचं की त्या जूनियर ला सजा ए काला पाणीची शिक्षा नशिबात असे किंवा एखाद्या सीनियर च नाव लिहिताना काना मात्रा चुकली तर हातात दिलेले पैसे अक्षरश परत घेतले जात. त्यात ही काही सीनियर संपूर्ण पैसे एकाच वेळी न देता दिवस भर चिल्लर पैसे देत ,पुन्हा पुन्हा देताना अगोदर किती झाले असे विचारत राहत. चार-पाच जणांनी असा ठरवून चिल्लर चा हिशोब केला की जूनियर चा खिसा आणि डोक रिकाम होत असे .
त्या हिशोबच्या परीक्षेत बहुतेक जण नापास होत असतच. ग्लास मध्ये काजू बदाम कमी आहेत म्हणून अजून काजू बदाम घेऊन असे ज्युनियरला सांगितले जाई. काजू आणि दूधाचे समप्रमाण सीनियर समोर मांडणे हीदेखील एक कला होती . ज्यांनी वर्गणी दिली त्यांना कमीतकमी दुधाचे ग्लास आणि ज्यांनी वर्गणी दिलीच नाही त्यांना अधिक अधिकाधिक दुधाचा ग्लास असाच फॉर्मुला वर्षानुवर्षे चालत असे आणि त्याचा त्रास ही कुणी करून घेत नसे .
मोहन मुठाळ
Thanks
See you again.
Comments